Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारही घसरणीसह उघडले. मात्र, ही घसरण तितकीशी नव्हती. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 09:37 IST2025-04-04T09:37:41+5:302025-04-04T09:37:56+5:30

Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारही घसरणीसह उघडले. मात्र, ही घसरण तितकीशी नव्हती. ...

Stock Market Today Sensex Nifty opens with decline Bank Nifty in green zone IT and metal stocks hit trump tariff effect | Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

Stock Market Today: घसरणीसह उघडले Sensex-Nifty, Bank Nifty ग्रीन झोनमध्ये; आयटी आणि मेटल स्टॉक्स आपटले 

Stock Market Today: जागतिक बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारही घसरणीसह उघडले. मात्र, ही घसरण तितकीशी नव्हती. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी घसरला. निफ्टीही ८० अंकांनी घसरला होता. पण बँक निफ्टी १३० अंकांनी वधारला. निफ्टी मिडकॅप निर्देशांकही १०० अंकांनी घसरला. मात्र काही वेळात सेन्सेक्स आणखी ५१३ अंकांनी घसरुन ७५,७८० वर आला. तर निफ्टी १८७ अंकांनी घसरून २३,०६३ वर व्यवहार करत होता.

कामकाजादरम्यान निफ्टी मिडकॅप निर्देशांकही १०० अंकांनी घसरला. मात्र, त्यानंतर ही घसरण थोडी वाढ झाल्याचं दिसून आलं. तर मिडकॅप ७०० अंकांनी घसरला. स्मॉलकॅप निर्देशांकही २३० अंकांनी घसरला. निफ्टी आयटी निर्देशांक सुमारे ७८० अंकांनी घसरला.

निफ्टीवर सर्वात मोठी घसरण ओएनजीसी, हिंदाल्को, टाटा मोटर्स, इन्फोसिस, बजाज ऑटोमध्ये झाली. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी केवळ एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचडीएफसी लाइफ, बजाज फिनसर्व्ह यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

५ वर्षांतील सर्वात मोठ्या इंट्राडे घसरणीत डाऊ १७०० अंकांनी घसरून ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला, तर नॅसडॅक ११०० अंकांच्या मोठ्या घसरणीसह ८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. एस अँड पी ५०० आणि रसेल २००० मध्येही ५ ते ७ टक्क्यांची घसरण झाली. अशा तऱ्हेनं जगभरातील बाजारपेठांमध्ये आजही विक्री सुरूच आहे. गिफ्ट निफ्टी १०० अंकांनी घसरून २३,२०० वर तर डाऊ फ्युचर्स देखील १०० अंकांनी घसरला. तर दुसरीकडे निक्केई ७०० अंकांनी घसरला.

कमॉडिटी बाजाराचीही स्थिती खराब

कमॉडिटी बाजाराची अवस्थाही बिकट होती. कच्च्या तेलाची किंमत ७ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह ७० डॉलरच्या खाली आली. सोनं ३० डॉलर्सनं घसरून ३१३० डॉलरवर तर चांदी ८ टक्क्यांनी घसरून ३२ डॉलरवर आली. देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव ५,४०० रुपयांनी घसरून ९९,८०० रुपयांवर पोहोचला. डॉलर निर्देशांक ६ महिन्यांच्या नीचांकी पातळी १०१ वर घसरला. 

Web Title: Stock Market Today Sensex Nifty opens with decline Bank Nifty in green zone IT and metal stocks hit trump tariff effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.