Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सुरुवातीच्या कामकाजात थोडा सकारात्मक दिसला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:55 IST2025-06-03T09:55:38+5:302025-06-03T09:55:38+5:30

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सुरुवातीच्या कामकाजात थोडा सकारात्मक दिसला.

Stock Market Today Sensex falls by 400 points after rallying by 119 points Bank Nifty also sees sell off | Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा

Stock Market Today: शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. या आठवड्यात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर अखेर आज बाजार सकारात्मक दिसला. सेन्सेक्स ११९ अंकांनी वधारून ८१,४९२ वर खुला झाला. निफ्टी ७० अंकांनी वधारून २४,७८६ वर पोहोचला. बँक निफ्टी २०१ अंकांनी वधारून ५६,१०४ वर पोहोचला. तर, रुपया ८५.३८ च्या तुलनेत ८५.५३/डॉलरवर उघडला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये हलकी खरेदी दिसून आली. ज्यात मेटल क्षेत्राला प्रथम पसंती होती.

विशेष म्हणजे तेजीनंतर लगेचच विक्रीचा सपाटा दिसून आला. ज्यामुळे सेन्सेक्स ४०० अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळला. बँक निफ्टीमध्ये विक्रमी वाढ झाल्यानंतर खासगी बँकांमध्ये विक्री सुरू झाली. ज्यामुळे घसरणही झाली होती.

कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन

कामकाजादरम्यान इटर्नल, टेक महिंद्रा, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

यामुळे रिकव्हरी

अमेरिकन बाजारांनी काल नेत्रदीपक सुधारणा दर्शविली आणि दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. डाऊ जोन्स आधी ४५० अंकांनी घसरला होता, पण शेवटी तो ३५ अंकांनी वधारून ग्रीन झोनमध्ये बंद झाला. तर टेक शेअर्सच्या मजबुतीमुळे नॅसडॅक निर्देशांक सुमारे १२५ अंकांनी वधारला. गिफ्ट निफ्टीही ४० अंकांच्या वाढीसह २४,८५० च्या वर व्यवहार करताना दिसला. मात्र, डाऊ फ्युचर्समध्ये जवळपास १०० अंकांची घसरण दिसून आली. आशियाई बाजारांबद्दल बोलायचं झालं तर जपानचा निक्केई निर्देशांक १७५ अंकांनी वधारला.

Web Title: Stock Market Today Sensex falls by 400 points after rallying by 119 points Bank Nifty also sees sell off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.