Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये

Stock Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये

Stock Market Today: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीनं रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्रीचा सपाटा दिसून आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:52 IST2025-02-12T09:52:56+5:302025-02-12T09:52:56+5:30

Stock Market Today: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीनं रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्रीचा सपाटा दिसून आला

Stock Market Today Sensex and Nifty open flat Stock market in red zone for sixth consecutive day | Stock Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये

Stock Market Today: सेन्सेक्स आणि निफ्टीची फ्लॅट ओपनिंग; सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार रेड झोनमध्ये

Stock Market Today: बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीनं रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. बाजारात सलग सहाव्या दिवशी विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्स ११५ अंकांनी घसरून ७६,१८८ वर, तर निफ्टीनं २१ अंकांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला. तर बँक निफ्टीने फ्लॅट ट्रेडिंग सुरू केलं आहे. आयटी निर्देशांकानं निफ्टीवर ताकद दाखवली. त्याचवेळी ऑईल अँड गॅस निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली. ऑटो, रियल्टी एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकातही घसरण दिसून आली.

सेन्सेक्स-३० च्या टॉप गेन्सबद्दल बोलायचं झालं तर टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, एचसीएलटेक, टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. असेच काहीसे निफ्टी-५० शेअर्समध्येही पाहायला मिळत आहे. आज जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये विक्री दिसून येत आहे.

शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या जोरदार घसरणीनंतर बुधवारी (१२ फेब्रुवारी) जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत. काल एफआयआयची मोठी विक्री झाली आहे, ज्यामुळे बाजाराची धारणा नकारात्मक आहे. कालच्या घसरणीत एफआयआयनं कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्स सह सुमारे ७ हजार कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत फंडांनी ४ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

ग्लोबल मार्केट्सचे अपडेट्स

काल अस्थिरतेमुळे अमेरिकी बाजारात संमिश्र वातावरण होते. डाऊ २७५ अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, तर दुसरीकडे टेस्लामध्ये ६ टक्क्यांच्या घसरणीदरम्यान नॅसडॅक ७० अंकांनी घसरला. फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पुन्हा एकदा व्याजदर कपातीची आशा मोडीत काढली. व्याजदरात कपात करण्याची घाई नसल्याचं त्यांनी काल अमेरिकन सिनेटमध्ये सांगितलं.

Web Title: Stock Market Today Sensex and Nifty open flat Stock market in red zone for sixth consecutive day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.