stock market : भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली. गुरुवारी शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक चांगल्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास १% च्या वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढीने बंद झाले. मेटल, ऑइल अँड गॅस आणि एनर्जी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. पीएसई, फार्मा, इन्फ्रा निर्देशांक वाढीने बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी झाली. आयटी आणि रियल्टी शेअर्समध्ये दबाव होता. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
ट्रॅम्प टॅरिफचा प्रभाव कमी होतोय?
बुधवारीही बाजार हिरव्या रंगात सुरू झाला आणि मोठ्या वाढीसह बंद झाला. सलग १० दिवस घसरणीत बंद झाल्यानंतर बुधवारी बाजार तेजीसह बंद झाला. त्यानंतर आज पुन्हा एकदा बाजारात तेजी आली आणि तो चांगल्या वाढीसह बंद झाला. ही गुंतवणूकदारांसाठी चांगली लक्षणे आहेत. गेल्या काही दिवसां ट्रम्प टॅरिफचा प्रभाव जाणावत होता. मात्र, कालपासून तो प्रभाव कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या शेअरमध्ये सर्वाधिक उसळी
गुरुवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २४ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या तर ५ कंपन्यांचे समभाग नुकसानासह लाल रंगात बंद झाले. तर एचडीएफसी बँकेचे शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० पैकी ३८ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले आणि उर्वरित १२ कंपन्यांचे समभाग तोट्यासह लाल चिन्हात बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक ४.७० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक २.३१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सच्या इतर शेअर्सची स्थिती कशी होती?
याशिवाय आज एनटीपीसीचे समभाग ३.४१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज २.९६ टक्के, टाटा स्टील २.८७ टक्के, बजाज फिनसर्व्ह २.३९ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर २.२२ टक्के, सन फार्मा २.०९ टक्के, अदानी पोर्ट्स २.०४ टक्के, एक्सिक बँक १.८५ टक्के, टीसीएस १.४२ टक्के, टायटन १.३५ टक्के, बजाज फायनान्स ०.९५ टक्के, एचसीएल टेक ०.७५ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.६६ टक्क्यांनी वाढले. तर कोटक महिंद्रा बँकेचे समभाग २.३१ टक्के, झोमॅटो ०.६२ टक्के, टाटा मोटर्स ०.१९ टक्के आणि इंडसइंड बँक ०.०७ टक्क्यांनी घसरले.