Stock Market Today: शुक्रवारी (११ जुलै) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली आहे. सेन्सेक्स ३६० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी १०० अंकांनी घसरुन उघडला. बँक निफ्टी स्थिर होता. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स ३७० अंकांनी घसरून ८२,८२० वर उघडला. निफ्टी १०० अंकांनी घसरून २५,२५५ वर उघडला. बँक निफ्टी ११३ अंकांनी घसरून ५६,८४३ वर उघडला.
कामकाजादरम्यान आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमध्ये सर्वात जास्त घसरण झाली. एचयूएल, इंडसइंड बँक, टाटा कंझ्युमर, एसबीआय लाईफ, पॉवर ग्रिडमध्ये निफ्टीमध्ये सर्वात जास्त वाढ झाली. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एम अँड एम, बजाज फिनसर्व्हमध्ये घसरण दिसून आली. रुपया १९ पैशांनी कमकुवत होऊन ८५.८२/डॉलर्सवर उघडला.
LIC मधील स्टेक विकण्याच्या तयारीत सरकार; किती राहणार हिस्सा, खासगी कंपनी बनणार?
काल, अमेरिकन बाजारांनी चांगली सुधारणा केली आणि पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला. नॅस्डॅक आणि एस अँड पी विक्रमी उच्चांकावर बंद झाले तर डाऊ २०० अंकांनी वधारला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर ३५ टक्के कर लादण्याची घोषणा केली. हे दर १ ऑगस्टपासून लागू केले जातील.