Stock Market Today: ट्रम्प यांचा मोठा टॅरिफ हल्ला जगातील सर्वच देशांवर झाला आहे. बुधवारी रात्री त्यांनी भारतावर २६ टक्के आणि चीनवर ३४ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. त्यानंतर निफ्टीच्या वीकली एक्सपायरीदरम्यान शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. तर निफ्टीतही १३० अंकांची घसरण झाली. फार्मा आणि पॉवर शेअर्समध्ये तेजी होती. तर आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
मागील बंदच्या तुलनेत सुरुवातीचे आकडे पाहता सेन्सेक्स ८०६ अंकांनी घसरून ७५,८११ वर उघडला. निफ्टी १८२ अंकांनी घसरून २३,१५० वर उघडला. बँक निफ्टी ४३८ अंकांनी घसरून ५०,९१० वर उघडला. चलन बाजारात रुपया २३ पैशांनी घसरून ८५.७३/डॉलरवर खुला झाला.
Profit Without Risk ची स्ट्रॅटजी; बनेल २ कोटी २६ लाख रुपयांचा फंड, जाणून घ्या कशी होईल ही जादू
९ एप्रिलपासून १८० हून अधिक देशांवर १० ते ४९ टक्क्यांपर्यंत कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा तऱ्हेनं अपेक्षेपेक्षा जास्त शुल्क आकारल्यानंतर व्यापारयुद्धाच्या भीतीनं गुरुवारी सकाळी अमेरिकन फ्युचर्सची स्थिती खराब दिसत होती. डाऊ फ्युचर्समध्ये ९०० अंकांची घसरण झाली, तर नॅसडॅक फ्युचर्समध्ये ७५० अंकांची मोठी घसरण झाली.
जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत
शुल्काच्या धक्क्यानं आशियाई बाजारातही खळबळ उडाली. गिफ्ट निफ्टी जवळपास ४०० अंकांनी घसरून २३,१०० च्या खाली आला होता, त्यानंतर इथून थोडा सावरत २५० अंकांच्या घसरणीवर आला होता. पण निक्केई ११०० अंकांनी घसरला होता. एफआयआय आणि देशांतर्गत फंडांनी काल भारतीय बाजारातील तेजीमध्ये हातभार लावला. एफआयआयने २९०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत फंडांनीही २८०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.