Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets Today: गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण

Stock Markets Today: गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण

Stock Markets Today: मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:45 IST2026-03-19T09:44:13+5:302026-03-19T09:45:15+5:30

Stock Markets Today: मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली.

Stock market today hit hard on Gudi Padwa 2026 Sensex falls by 1600 points HDFC falls sharply | Stock Markets Today: गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण

Stock Markets Today: गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार आपटला, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला; HDFC मध्ये मोठी घसरण

Stock Markets Today: मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. सकाळी ०९:२० वाजताच्या सुमारास सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी कोसळून ७५,००० च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी देखील २ टक्क्यांनी म्हणजेच सुमारे ५०० अंकांनी घसरून २३,२८५ वर आला होता. बँक निफ्टीमध्येही ३ टक्क्यांची मोठी घसरण होऊन तो ५३,७०० च्या पातळीवर पोहोचला असून संपूर्ण बाजार ९० टक्के मंदीच्या छायेत दिसून येत आहे.

बाजारातील अस्थिरता आणि क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

या अस्थिरतेमुळे बाजारातील भीती दर्शवणारा इंडिया VIX निर्देशांक १५ टक्क्यांनी उसळून २१.४३ च्या पातळीवर पोहोचला आहे. वैयक्तिक शेअर्सचा विचार करता एचडीएफसी बँक सुरुवातीच्या सत्रात सुमारे ५ टक्क्यांनी खाली घसरली होती. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वत्र विक्रीचा दबाव असून विशेषतः रियल्टी, प्रायव्हेट बँक, पीएसयू बँक, NBFC, आयटी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. ऑईल अँड गॅस निर्देशांकात मात्र इतर क्षेत्रांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ०.८ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

अलख पांडेंसमोरील अडचणी वाढल्या, आयकर विभागानं Physicswallah ला पाठवली ₹२६३ कोटींची नोटीस

प्रमुख शेअर्स: वधारलेले आणि घसरलेले

निफ्टी ५० च्या यादीत केवळ ONGC, Coal India आणि NTPC हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत असून ते टॉप गेनर्स ठरले आहेत. दुसरीकडे घसरणाऱ्या शेअर्समध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर होती, मात्र नंतर खालच्या स्तरावरून त्यात थोडी सुधारणा झाली. याव्यतिरिक्त LT, TMPV, Shriram Finance, Axis Bank, Bajaj Finance आणि Eternal यांसारख्या प्रमुख शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. गिफ्ट निफ्टी आणि आशियाई बाजारातही हीच नकारात्मक स्थिती कायम आहे.

इराणवरील हल्ला आणि बिघडलेली परिस्थिती

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांनंतर परिस्थिती वेगाने बिघडली असून ताज्या माहितीनुसार इस्रायलनं इराणच्या ऑईल आणि गॅसच्या तळांना लक्ष्य केलं. या हवाई हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खातिब यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, या घटनेमुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि इक्विटी बाजारावर थेट परिणाम होत आहे. या गंभीर घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अस्थिरता वाढण्याचा धोका निर्माण झालाय.

इराणचा पलटवार आणि आखाती देशांवर वाढता धोका

इराणनं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना कतारच्या गॅस तळांवर क्षेपणास्त्रं डागली आहेत. यासोबतच इराणनं सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या तेल सुविधांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. युद्धाच्या या विस्तारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी आणि कमोडिटी बाजारावर दबाव वाढला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील बनलाय.

Web Title : गुड़ी पड़वा पर शेयर बाजार में भारी गिरावट, मध्य पूर्व तनाव हावी

Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के कारण गुड़ी पड़वा पर भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स 1600 अंक गिरा, निफ्टी 2% नीचे आया, और एचडीएफसी बैंक में बड़ी गिरावट हुई। भू-राजनीतिक अस्थिरता ने निवेशकों को डरा दिया।

Web Title : Stock Market Crashes on Gudi Padwa Amid Middle East Tensions

Web Summary : Indian stock markets plummeted on Gudi Padwa due to escalating Middle East tensions. Sensex crashed over 1600 points, Nifty fell by 2%, and HDFC Bank saw a significant drop. Geopolitical instability and threats to oil supplies triggered investor fear, impacting global markets.