Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: जागतिक बाजाराचा परिणाम, शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला

Stock Market Today: जागतिक बाजाराचा परिणाम, शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 09:33 IST2025-02-19T09:33:20+5:302025-02-19T09:33:20+5:30

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला.

Stock Market Today Global market impact stock market hit Sensex falls by 360 points | Stock Market Today: जागतिक बाजाराचा परिणाम, शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला

Stock Market Today: जागतिक बाजाराचा परिणाम, शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला

Stock Market Today: आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले. सेन्सेक्स ३६० अंकांनी घसरला, तर निफ्टी १२० अंकांनी घसरला आहे. हीच स्थिती बँक निफ्टीची आहे, ज्यामध्ये २३० अंकांची घसरण दिसून आली. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर सोनं ८५ रुपयांनी घसरून ८६,०२८ रुपयांवर व्यवहार करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्रेडवॉरची आग पेटवली आहे. कार, चिप्स आणि औषधांच्या (फार्मास्युटिकल) आयातीवर २५ टक्के शुल्क लादणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. अंतिम निर्णय २ एप्रिल रोजी अपेक्षित आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून भारतीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

एस अँड पी ५०० लाइफ टाइम हायवर

ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार झाले. शेवटच्या तासातील खरेदीमुळे एस अँड पी ५०० निर्देशांक १५ अंकांच्या वाढीसह आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. डाऊ जोन्सनं सुरुवातीच्या घसरणीतून सावरत २५० अंकांची सुधारणा केली आणि अखेरीस १० अंकांची किरकोळ वाढ नोंदवली.

म्युच्युअल फंडांसाठी नवे नियम

भारतीय बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी (एएमसी) नवे नियम जारी केले आहेत. आता म्युच्युअल फंडांच्या स्ट्रेस टेस्टिंगचा खुलासा करणं आवश्यक ठरणार आहे. याशिवाय एनएफओ (न्यू फंड ऑफर) मधून जमा झालेली रक्कम विहित मुदतीत गुंतविणं बंधनकारक असेल. हे नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू होतील.

Web Title: Stock Market Today Global market impact stock market hit Sensex falls by 360 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.