आज शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात फ्लॅट ओपनिंग दिसून आली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक उघडल्यानंतर ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. आज सकाळी सेन्सेक्स १६ अंकांनी वधारून ७३,००५ वर उघडला. निफ्टी ९ अंकांनी घसरून २२,०७३ वर उघडला. तर बँक निफ्टी ४ अंकांनी घसरून ४८,२४१ वर खुला झाला. रुपयाही ४ पैशांनी मजबूत होऊन ८७.२३/डॉलरवर स्थिरावला.
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आज निफ्टी फार्मा आणि कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स वगळता सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत. मात्र, या दोन्ही निर्देशांकांमध्येही किंचित घसरण दिसून येत आहे. निफ्टी स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही तेजी दिसून आली.
आज कामकाजादरम्यान एचसीएल टेक, महिंद्रा, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एलअँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली.
अमेरिकी बाजारांची स्थिती खराब
अमेरिका आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार यांच्यातील वाढत्या शुल्क युद्धामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. बुधवारी अमेरिकन बाजार पुन्हा एकदा मोठ्या घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स दोन दिवसांत ६७० अंकांनी घसरून एकूण १३०० अंकांवर बंद झाला, तर नॅसडॅक ६५ अंकांनी घसरून चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आज त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येत आहे.
या विधानातून दिलासा
मात्र, अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मेक्सिको आणि कॅनडावर लादण्यात आलेल्या शुल्कात दिलासा दिला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. या बातमीनंतर डाऊ फ्युचर्समध्ये २०० अंकांची वाढ दिसून आली, तर जपानचा निक्केई निर्देशांकही १०० अंकांनी मजबूत झाला.