Stock Market Update : मंगळवारी सपाट पातळीवर बंद झालेला भारतीय शेअर बाजारात आज चांगली तेजी पाहायला मिळाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाची गुंतवणूकदार वाट पाहत असतानाच, आज बुधवारी (२९ ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांकनिफ्टी ५० आणि सेन्सेक्स तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स ०.४४% च्या वाढीसह ८४,९९७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी ५० ०.४५% च्या तेजीसह २६,०५३ च्या पातळीवर स्थिरावला.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटने आज बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत अधिक मजबूत कामगिरी केली. बीएसई मिडकैपमध्ये ०.६७% आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.५६% ची तेजी दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकात दमदार वाढ
आजच्या व्यवहारात अनेक क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मोठी तेजी नोंदवली गेली. ऑइल अँड गॅस आणि उर्जा क्षेत्रात सर्वाधिक वधारले.
| क्षेत्रीय निर्देशांक | वाढ (%) ||
| निफ्टी ऑइल अँड गॅस | २.१२% |
| निफ्टी उर्जा | १.९३% |
| निफ्टी कमोडिटीज | १.७३% |
| निफ्टी मेटल | १.७१% |
| निफ्टी मीडिया | १.६३% |
| निफ्टी इन्फ्रा | १.२२% |
| क्षेत्रीय निर्देशांक | वाढ (%) |
| निफ्टी ऑइल अँड गॅस | २.१२% |
| निफ्टी उर्जा | | १.९३% |
| निफ्टी कमोडिटीज | १.७३% |
| निफ्टी मेटल | १.७१% |
| निफ्टी मीडिया | १.६३% |
| निफ्टी इन्फ्रा | १.२२% |
घसरण झालेले सेक्टर: दुसरीकडे, निफ्टी कॅपिटल मार्केट (१.८७%), निफ्टी ऑटो (०.७३%) आणि निफ्टी इंडिया डिफेन्स (०.२३%) या क्षेत्रांमध्ये घसरण दिसून आली.
निफ्टी ५० मधील टॉप गेनर्स आणि लूजर्स
निफ्टी ५० कंपन्यांमध्ये आज अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली.
- अदानी पोर्ट्स : २.६१%
- पॉवर ग्रिड : २.४७%
- एनटीपीसी : २.४७%
- एचसीएल टेक : २.३२%
- श्रीराम फायनान्स : २.०४%
टॉप लूजर्स :
आजच्या व्यवहारात डॉ रेड्डीजच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
- डॉ रेड्डीज : -३.००%
- कोल इंडिया : -२.४१%
- भारत इलेक्ट्रॉनिक्स : -१.५४%
- महिंद्रा अँड महिंद्रा : -१.२५%
- इटरनल : -१.२५%
वाचा - इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
बाजारातील हा सकारात्मक कल कायम राहतो की नाही, हे आता अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आज रात्री जाहीर होणाऱ्या निर्णयावर अवलंबून असेल.
