Lokmat Money >शेअर बाजार > भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

या वर्षी 5 डिसेंबर रोजी या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹11.75 तर नीचांक ₹1.70 होता. हा हेअर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहे आणि सुमारे 76 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 91.97 कोटी रुपये आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 20:39 IST2024-12-09T20:38:57+5:302024-12-09T20:39:39+5:30

या वर्षी 5 डिसेंबर रोजी या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹11.75 तर नीचांक ₹1.70 होता. हा हेअर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहे आणि सुमारे 76 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 91.97 कोटी रुपये आहे.

Stock market thinkink picturez share surges 5 percent price 1 rupees after declared 2 bonus share | भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

भारीच...! ही कंपनी 1 वर 2 बोनस शेअर देणार, सोबतच 100% डिव्हिडेन्डही वाटणार, शेअर खरेदासाठी तुटून पडले लोक!

शेअर बाजारातील पेनी स्टॉक थिंकिंक पिक्चर्जचा (Thinkink Picturez) शेअर आज सोमवारच्या व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होता. या शेअरमध्ये आज 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि तो इंट्राडे ट्रेडमध्ये ₹1.94 वर पोहोचला होता. 

शेअरमधील या तेजीचे कारण एक पॉझिटिव्ह बातमी आहे. खरे तर, कंपनीने बोनस शेअर आणि डिव्हिडेन्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. 5 डिसेंबरच्या एका एक्सचेन्ज फायलिंगमध्ये, म्हणण्यात आले आहे की, बोनस शेअर आणि इक्विटी शेअर्सवर 100 टक्के डिव्हिडेन्डवर विचार करण्यासंदर्भात सोमवारी (16 डिसेबर) कंपनीच्या बोर्ड मेंबर्सची बैठक होणार आहे.

एक एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे, "बोर्ड, पात्र शेअरधारकांकडील प्रत्येक एका शेअरवर दोन बोनस शेअर जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल. याच बरोबर इक्विटी शेअर्सवर 100 टक्के डिव्हिडेन्डवरही विचार करण्यात येईल. यासाठी सोमवारी कंपनीच्या बोर्ड मेंबर्सची बैठक होणार आहे." याच बरोबर, बोर्ड हॉलीवुडमध्ये प्रवेश करून ग्लोबल मनोरंजन बाजारात विस्तार करण्यासंदर्भातील धोरणात्मक प्रस्तावाचे मूल्यांकनही करेल.

अशी आहे थिंकिंक पिक्चर्ज शेअरची स्थिती -
या वर्षी 5 डिसेंबर रोजी या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹11.75 तर नीचांक ₹1.70 होता. हा हेअर गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहे आणि सुमारे 76 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 91.97 कोटी रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: Stock market thinkink picturez share surges 5 percent price 1 rupees after declared 2 bonus share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.