Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स

Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स

Share Market Opening 8 October, 2025: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचं सत्र आज थांबलं. शेअर बाजाराने आज घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 10:12 IST2025-10-08T10:12:57+5:302025-10-08T10:12:57+5:30

Share Market Opening 8 October, 2025: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचं सत्र आज थांबलं. शेअर बाजाराने आज घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला.

Stock market starts in red zone Shares of these companies opened with big fluctuations | Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स

Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स

Share Market Opening 8 October, 2025: देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीचं सत्र आज थांबलं. शेअर बाजाराने आज घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) २७.२४ अंकांनी (०.०३%) घसरणीसह ८१,८९९.५१ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्स (NSE Nifty 50 Index) देखील आज २८.५५ अंकांनी (०.११%) घसरणीसह २५,०७९.७५ अंकांवर व्यवहार सुरू केला.

मंगळवारी सेन्सेक्स ९३.८३ अंकांच्या तेजीसह ८१,८८३.९५ अंकांवर आणि निफ्टी ७.६५ अंकांच्या माफक वाढीसह २५,०८५.३० अंकांवर उघडला होता.

बुधवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले, तर उर्वरित १६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी केवळ १६ कंपन्यांच्या शेअर्सनी तेजीसह ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू केला, तर उर्वरित ३३ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले आणि १ कंपनीचा शेअर कोणताही बदल न होता उघडला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टायटनचे शेअर्स आज सर्वाधिक २.९७ टक्के वाढीसह उघडले आणि सन फार्माचे शेअर्स आज सर्वाधिक ०.५६ टक्के घसरणीसह उघडले.

सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांची आजची सुरुवात

सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये आज टाटा स्टीलचे शेअर्स ०.६१ टक्के, बजाज फायनान्स ०.३१ टक्के, भारती एअरटेल ०.३० टक्के, एशियन पेंट्स ०.३० टक्के, टीसीएस ०.२७ टक्के, इन्फोसिस ०.२६ टक्के, मारुती सुझुकी ०.१९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.१९ टक्के, बीईएल ०.१९ टक्के, भारतीय स्टेट बँक ०.१० टक्के, पॉवरग्रिड ०.१० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.१० टक्के आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स ०.०८ टक्के घसरणीसह उघडले.

दुसरीकडे, बुधवारी एटरनलचे शेअर्स ०.४० टक्के, एल अँड टी ०.३२ टक्के, टाटा मोटर्स ०.३१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.२५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.२३ टक्के, एचसीएल टेक ०.२० टक्के, एचडीएफसी बँक ०.१८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.१८ टक्के, अडाणी पोर्ट्स ०.१४ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.१२ टक्के, टेक महिंद्रा ०.११ टक्के, आयटीसी ०.१० टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.०७ टक्के, एनटीपीसी ०.०७ टक्के आणि ट्रेंटचे शेअर्स ०.०२ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.

Web Title : शेयर बाजार लाल निशान में खुला; कंपनियों के शेयरों में उतार-चढ़ाव

Web Summary : भारतीय शेयर बाजार में गिरावट; सेंसेक्स और निफ्टी लाल निशान पर खुले। विभिन्न क्षेत्रों में मिश्रित प्रदर्शन, कुछ शेयरों में लाभ तो कुछ में गिरावट। टाइटन लाभ में, सन फार्मा में सबसे बड़ी गिरावट।

Web Title : Share Market Opens in Red; Volatility Seen in Company Stocks

Web Summary : Indian stock market dips; Sensex and Nifty open in red. Mixed performance across sectors, with some stocks gaining while others decline. Titan leads gains, Sun Pharma sees biggest drop.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.