Stock Market Opening : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मंगळवारी फ्लॅट टू पॉझिटिव्ह झाली आणि निफ्टी ३४ अंकांच्या वाढीसह २४६५३ वर तर सेन्सेक्स ५४ अंकांच्या वाढीसह ८१५६२ वर उघडला. कालच्या सत्रात निफ्टीनं २४६०० च्या पातळीवरून सपोर्ट घेतला.
आज बाजार उघडताच निफ्टी ५० पॅकमधील टॉप गेनर्समध्ये बीईएल, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला, इन्फोसिस, ग्रासिम इंडस्ट्रीज, विप्रो यांचा समावेश होता. तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी ५० निर्देशांकातील टॉप लूजर्सबद्दल बोलायचं झालं तर ओएनजीसी, अल्ट्राटेक, बजाज ऑटो, टीसीएस, टायटन कंपनी सारख्या शेअर्सचा यामध्ये समावेश होता.
सोमवारी दिवसभर निफ्टी साइडवेज ट्रेड करत होता. या आठवड्यात कोणताही मोठा इवेंट नाही आणि बाजार आणखी पुढे जाण्यासाठी ट्रिगरच्या शोधत आहे. थोडी डीप करेक्शन झाल्यास निफ्टीला २४४७० च्या आसपास सुरुवातीचा सपोर्ट मिळाला आहे. या पातळीच्या खाली गेल्यास निफ्टीमध्ये २००-२५० अंकांचं करेक्शन होऊ शकतं.
अमेरिकन बाजारात घसरण
वॉल स्ट्रीटचे मुख्य निर्देशांक सोमवारी घसरणीसह बंद झाले, याचं कारण म्हणजे एआय प्रमुख कंपनी एनव्हीडियामध्ये घसरण झाली. आयटी शेअर्सवर परिणाम झाला. या आठवड्याच्या अखेरीस येणाऱ्या महत्त्वाच्या इन्फ्लेशन रिपोर्टकडे अमेरिकेतील गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.