stock market : गेल्या ३ दिवसांच्या सलग पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज किंचित वाढीसह उघडला. पण सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक सेन्सेक्स आज ११७ अंकांच्या वाढीसह ७९,३३५.४८ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो १७५ अंकांनी घसरून ७९,०६१ वर व्यापार करत होता. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी ११ शेअर्स हिरव्या रंगात तर १९ शेअर्स लाल चिन्हावर रंगात करताना दिसले. त्याचवेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकनिफ्टी ४९ अंकांनी घसरून २३,९०२ वर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टी पॅकच्या ५० शेअर्सपैकी २२ शेअर्स हिरव्या रंगात आणि २८ शेअर्स लाल रंगात व्यवहार करत होते.
या शेअर्समध्ये घसरण
निफ्टी पॅकच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण एक्सिस बँकमध्ये १.३१ टक्के, लार्सन अँड टुब्रो १.०८ टक्के, आ.टीसी १.०१ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.९९ टक्के आणि सिप्लामध्ये ०.८६ टक्के घसरण झाली.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी बँक ०.३५ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस २.२७ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.३० टक्के, निफ्टी आयटी ०.०३ टक्के, निफ्टी मेटल ०.३३ टक्के, निफ्टी फार्मा ०.०१ टक्के, निफ्टी पीएसयू बँक ०.५२ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक ०.४८ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ०.४३ टक्के, निफ्टी मिडस्मॉल आयटी आणि टेलिकॉममध्ये ०.१० टक्के घसरण दिसून आली. त्याचवेळी, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये ०.१० टक्के, निफ्टी ऑइल आणि गॅसमध्ये ०.४५ टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स ०.१९ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स ०.०४ टक्के, निफ्टी रियल्टी ०.०६ टक्के, निफ्टी मीडिया ०.५३ टक्के आणि निफ्टी ऑटो ०.०८ टक्क्यांनी वाढले.