Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

Stock Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:02 IST2026-03-24T17:02:35+5:302026-03-24T17:02:35+5:30

Stock Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली.

Stock Market Recovery March 24: Sensex Jumps 1,372 Points as Trump Halts Iran Attack for 5 Days | बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

Stock Market : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या छायेत असलेल्या भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार पुनरागमन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'पुढील ५ दिवस इराणवर हल्ला करणार नाही', असे जाहीर करताच जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही खरेदीचा उत्साह संचारला. सोमवारी झालेल्या भीषण पडझडीनंतर, आज सेन्सेक्स आणि निफ्टीने सुमारे २ टक्क्यांची भरारी घेत गुंतवणूकदारांचे नुकसान भरून काढले.

बाजाराची आजची कामगिरी
बीएसई सेन्सेक्स : १३७२.०६ अंकांच्या (१.८९%) वाढीसह ७४,०६८.४५ वर बंद झाला.
एनएसई निफ्टी ५० : ३९९.७५ अंकांच्या (१.७८%) तेजीसह २२,९५७.८० वर स्थिरावला.
सोमवारची स्थिती : काल सेन्सेक्स १८३६ अंकांनी, तर निफ्टी ६०१ अंकांनी कोसळला होता. आजच्या रिकव्हरीमुळे बाजाराने पुन्हा एकदा २३,००० चा टप्पा गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

शेअर्सचा लेखाजोखा: ३० पैकी २९ शेअर्स 'हिरवे'
आजच्या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स नफ्यात बंद झाले. केवळ एका शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
आजचे टॉप गेनर्स (तेजीत असलेले शेअर्स): 
इंडिगो : ५.४१% वाढीसह आघाडीवर.
एल अँड टी : ५.३३% तेजी.
इटरनल : ४.९४% नफा.
एशियन पेंट्स : ४.७७% वाढ.
बजाज फायनान्स : ४.६९% तेजी.
इतर दिग्गज शेअर्स : अल्ट्राटेक सिमेंट (४.१५%), टेक महिंद्रा (३.४८%), अदानी पोर्ट्स (३.१६%), कोटक बँक (३.०९%) आणि एचडीएफसी बँक (२.८८%) या शेअर्सनीही बाजाराला बळ दिले.

वाचा - सिलेंडर बुकिंगसाठी आता द्यावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे! पाहा BPCL चे १० नवे नियम

आजचे लूजर्स (घसरण झालेले शेअर्स)
आजच्या अष्टपैलू तेजीमध्ये केवळ काही शेअर्सना विक्रीचा सामना करावा लागला:
पॉवर ग्रिड : १.०३% घसरणीसह सेन्सेक्समधील एकमेव लाल निशाणातील शेअर.
निफ्टी ५० : ५० पैकी ४५ शेअर्स वधारले, तर ५ शेअर्समध्ये घसरण झाली.
 

Web Title : ट्रंप कार्ड से बाजार में उछाल: सेंसेक्स में ज़ोरदार वृद्धि, निफ्टी 23,000 के करीब

Web Summary : ट्रंप के बयान से बाजार शांत हुआ, जिससे जोरदार सुधार हुआ। सेंसेक्स 1372 अंक बढ़ा, निफ्टी 23,000 के करीब। सोमवार के नुकसान से उबरते हुए ज्यादातर शेयरों में तेजी आई।

Web Title : Trump Card Boosts Market: Sensex Soars, Nifty Nears 23,000

Web Summary : Trump's statement calmed markets, triggering a strong recovery. Sensex rose by 1372 points, Nifty neared 23,000. Most shares gained, recovering from Monday's losses.