Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शुक्रवारी शेअर बाजारातील सुरू असलेली तेजी आज थांबली. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे दबावामुळे सकाळीच्या सत्रात सेन्सेक्स १४७.६७ अंकांनी घसरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:08 IST2025-09-19T10:08:32+5:302025-09-19T10:08:32+5:30

शुक्रवारी शेअर बाजारातील सुरू असलेली तेजी आज थांबली. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे दबावामुळे सकाळीच्या सत्रात सेन्सेक्स १४७.६७ अंकांनी घसरला.

Stock market rally halted Sensex suffers setback Nifty also falls These major stocks fall | शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

शुक्रवारी शेअर बाजारातील सुरू असलेली तेजी आज थांबली. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या नफा वसुलीमुळे दबावामुळे सकाळीच्या सत्रात सेन्सेक्स १४७.६७ अंकांनी घसरला, तर निफ्टीही ३० अंकांनी घसरून २५,३९३.६० वर पोहोचला. या घसरणीत अनेक प्रमुख शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स विशेषतः कमकुवत होते.

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीमध्ये चढ-उतार दिसून आला. हीरो मोटोकॉर्प, श्रीराम फायनान्स, मारुती सुझुकी, एनटीपीसी आणि टेक महिंद्रा सारख्या दिग्गज कंपन्यांनी वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा दिला, तर आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर आणि टायटन कंपनी सारख्या दिग्गज कंपन्यांमधील कमकुवतपणामुळे बाजारावर परिणाम झाला.

बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे द्या; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी

सकाळच्या व्यापारात अदानी समूहाचे सर्व शेअर्स तेजीत व्यापार करत होते. गौतम अदानी यांना मोठा दिलासा देत बाजार नियामक सेबीनं गुरुवारी गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाला अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडनबर्ग रिसर्चनं लावलेल्या स्टॉक मॅनिपुलेशन आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली.

जागतिक बाजारपेठेची स्थिती

शुक्रवारी जागतिक बाजारात संमिश्र कल दिसून आला. टोक्योच्या वेळेनुसार सकाळी ११:४४ वाजेपर्यंत एस अँड पी 500 फ्युचर्समध्ये फारशी हालचाल नव्हती. जपानचा टॉपिक्स निर्देशांक ०.७% च्या वाढीसह मजबूत दिसला, तर ऑस्ट्रेलियाचा S&P/ASX 200 देखील ०.६% वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक किरकोळ ०.२% वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, चीनच्या शांघाय कंपोझिट इंडेक्समध्ये ०.२% ची घसरण दिसून आली. युरोपचे युरो स्टॉक्स ५० फ्युचर्स देखील कोणत्याही महत्त्वपूर्ण चढ-उतारांशिवाय जवळजवळ स्थिर राहिले.

Web Title: Stock market rally halted Sensex suffers setback Nifty also falls These major stocks fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.