Share Market : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (५ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी दिसून आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केल्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आणि त्यांनी जोरदार खरेदी केली. या तेजीमुळे ब्रॉड मार्केटमध्ये थोडी संमिश्र प्रतिक्रिया असली तरी, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
बँकिंग, ऑटो शेअर्समध्ये जोरदार खरेदी
आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे बँकिंग, फायनान्शियल, रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याशिवाय, अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षेमुळे आयटी शेअर्स आणि मेटल शेअर्समध्येही चांगली तेजी राहिली.
स्मॉलकॅपमध्ये घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले
आज ब्रॉडर मार्केटचा कल मात्र संमिश्र होता. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.६७ टक्क्यांची घसरण दिसून आली.
या संमिश्र कलानंतरही, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४७०.८० लाख कोटींवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास ९५,००० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्समधील सर्वाधिक तेजीचे ५ शेअर्स
- स्टेट बँक ऑफ इंडिया : २.५३%
- बजाज फिनसर्व्ह : २.०८%
- बजाज फायनान्स : १.९८%
- मारुती सुझुकी : १.७९%
- एचसीएल टेक : १.६३%
सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरणीचे ५ शेअर्स
- हिंदुस्तान युनिलिव्हर : ३.३८%
- इटरनल : १.३०%
- ट्रेंट : १.१५%
- सन फार्मा : ०.७५%
- टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल : ०.७२%
बाजारातील एकूण चित्र
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आज घसरण नोंदवणाऱ्या शेअर्सची संख्या अधिक होती. एकूण ४,३२८ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी १,८१६ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर २,३२६ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. याशिवाय, ९१ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ३०४ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला.
वाचा - 'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
