Lokmat Money >शेअर बाजार > किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

Stock Market Updates: विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार किरकोळ तेजीसह उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २३०५५ वर तर सेन्सेक्स ३० अंकांनी वधारून ७६२०१ वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:40 IST2025-02-13T09:40:14+5:302025-02-13T09:40:14+5:30

Stock Market Updates: विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार किरकोळ तेजीसह उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २३०५५ वर तर सेन्सेक्स ३० अंकांनी वधारून ७६२०१ वर उघडला.

Stock market opens with minor gains Nifty crosses 23100 in early trade bse nse sensex trade | किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला; सुरुवातीच्या कामकाजात Nifty २३,१०० पार

Stock Market Updates: विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजार किरकोळ तेजीसह उघडला. निफ्टी १० अंकांनी वधारून २३०५५ वर तर सेन्सेक्स ३० अंकांनी वधारून ७६२०१ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,१०० च्या वर ट्रेड करताना दिसत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळपास अर्धा टक्क्यांनी वधारला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर एफएमसीजीएम, आयटी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स वगळता सर्व निर्देशांक ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. सिप्ला, कोटक महिंद्रा बँक आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांचे शेअर्समध्ये सध्या निफ्टीत तेजी दिसून येत आहे, तर टेक महिंद्रा, टाटा कन्झ्युमर आणि एचसीएल मध्ये घसरण दिसून येत आहे.

शेअर बाजार सध्या बराच अस्थिर आहे. बुधवारी इंट्राडेमध्ये निफ्टी २२८०० च्या खाली घसरला आणि अखेर २६ अंकांच्या घसरणीसह २३०४५ वर बंद झाला. या रेंजनं आता डबल बॉटम पॅटर्न तयार केला आहे. बाजारासाठी २२,८०० च्या रेंजमध्ये महत्त्वपूर्ण आधार आहे, जो आणखी मोठ्या करेक्शनकडे इशारा देईल. एसजीएक्स निफ्टी ७० अंकांनी वधारला आहे जो बाजाराच्या घसरणीकडे संकेत देत आहे. बाजाराचा मूळ कल कमकुवत आहे. मात्र, त्यात रिबाऊंडची पूर्ण शक्यता आहे. तांत्रिक आधारावर २३१५० ते २३२०० ची रेंज ओलांडल्यास बाजारात अल्पावधीसाठी उसळी येण्याची शक्यता आहे.

महागाईवर दिलासा

महागाईच्या आघाडीवर आपल्या देशात दिलासा देणारी बातमी आहे. किरकोळ महागाईचा दर जानेवारीत पाच महिन्यांतील नीचांकी म्हणजे ४.३१ टक्क्यांवर आला आहे. त्याचवेळी अमेरिकेत महागाईचे जोरदार आकडे समोर आले आहेत, ज्यामुळे डाऊ जोन्समध्ये घसरण दिसून आली आहे. अशा तऱ्हेनं ट्रम्प यांच्यावर टॅरिफ वॉरबाबत सावध राहण्याचा दबाव वाढला आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तेथे ट्रम्प यांच्याशी कोणत्या प्रकारच्या वाटाघाटी आणि करार होतात, याकडे बाजाराचं लक्ष असणार आहे.

Web Title: Stock market opens with minor gains Nifty crosses 23100 in early trade bse nse sensex trade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.