Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारांची शुक्रवारी बाजार उघडताना कमकुवत सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले, पण ती वाढ जवळपास फ्लॅट होती आणि इंडेक्स तिथे टिकू शकले नाहीत व लगेच रेड झोनमध्ये घसरले. तरीसुद्धा, बाजार ५३% बुलिश ट्रेड करत होता. निफ्टी ४० अंकांनी घसरून २५,८५० च्या आसपास व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये १५० अंकांची घसरण होती. बँक निफ्टी देखील रेड आणि ग्रीन झोनदरम्यान हेलकावे घेत होता. मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार दिसत होता.
कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स १११ अंकांनी वर ८४,६६७ वर उघडला होता. निफ्टी ४४ अंकांनी वर २५,९३५ वर उघडला होता आणि बँक निफ्टी ९४ अंकांनी वर ५८,१७२ वर उघडला होता. पण बाजार उघडल्यानंतर लगेच त्यात घसरण झाली.
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
निफ्टीवर डिफेन्स शेअर्समध्ये खरेदी दिसून येत होती. हिंदाल्को, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, बीईएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. तर एचयूएल, सिप्ला, कोटक महिंद्रा बँक, टाटा कन्झ्युमर, अॅक्सिस बँक आणि मॅक्स हेल्थमध्ये सर्वाधिक घसरण झाली. जागतिक बाजारात तेजी असताना सकाळी गिफ्ट निफ्टी ४० अंकांची वाढ होऊन २६,०६० च्या जवळ ट्रेड करत होता. निक्केईमध्ये ६०० अंकांहून अधिक तेजी होती, तर डाऊ फ्युचर्स हलकी वाढ दर्शवत होते.
