Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Stock Market Today: शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२३ जानेवारी) किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३० अंकांच्या घसरणीसह ७६,२२० वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:47 IST2025-01-23T09:47:01+5:302025-01-23T09:47:01+5:30

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२३ जानेवारी) किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३० अंकांच्या घसरणीसह ७६,२२० वर व्यवहार करत होता.

Stock market opens in red zone Nifty at 23100 FMCG and banking shares fall | Stock Market Today: शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Stock Market Today: शेअर बाजार रेड झोनमध्ये उघडला, निफ्टी २३,१०० वर; FMCG आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी (२३ जानेवारी) किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३० अंकांच्या घसरणीसह ७६,२२० वर व्यवहार करत होता. निफ्टी २२ अंकांच्या घसरणीसह २३,१२० अंकांच्या आसपास होता. बँक निफ्टी १३० अंकांनी घसरून ४८,६०० च्या वर व्यवहार करत होता.

एफएमसीजी आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण दिसत होती. तर निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस या शेअरमध्ये तेजी होती. तर एचयूएल, नेस्ले, एलटी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

सकाळी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. काल बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. आज निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे आज बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अमेरिकेच्या बाजारात ३ दिवसांपासून ट्रम्प यांची रॅली सुरू आहे. बुधवारी टेक शेअर्सच्या जोरावर एस अँड पी ५०० ने इंट्राडेमध्ये विक्रमी उच्चांक गाठला, त्यानंतर नॅसडॅकनं अडीचशे अंकांची झेप घेतली. डाऊ १३० अंकांनी वधारून बंद झाला.
पण आज सकाळी गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी घसरून २३१५० च्या जवळ होता. तर डाऊ फ्युचर्स फ्लॅट होते आणि निक्केई १७५ अंकांनी वधारला.

Web Title: Stock market opens in red zone Nifty at 23100 FMCG and banking shares fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.