Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. बाजार किरकोळ तेजीसह उघडला आणि नंतर रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:42 IST2025-04-16T09:42:36+5:302025-04-16T09:42:36+5:30

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. बाजार किरकोळ तेजीसह उघडला आणि नंतर रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली.

Stock market opens flat PSU banks and realty sectors rise pharma shares fall | Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; PSU बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी, फार्मा शेअर्स आपटले

Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. बाजार किरकोळ तेजीसह उघडला आणि नंतर रेड झोनमध्ये व्यवहार करण्यास सुरुवात केली. सेन्सेक्स २६२ अंकांनी वधारून ७६,९९६ वर उघडला. निफ्टी १६ अंकांनी वधारून २३,३४४ वर उघडला. बँक निफ्टी ३११ अंकांनी वधारून ५२,६९० वर उघडला. रुपया ०.२२ टक्क्यांनी मजबूत होऊन ८५.५८ प्रति डॉलरवर खुला झाला. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर पीएसयू बँक आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर आयटी, मेटल आणि फार्मा सेक्टरला विक्रीला सामोरं जावं लागत आहे.

कामकाजादरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी या बँकांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर इन्फोसिस, एटीपीसी, मारुती, सनफार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५ लाख, मिळेल ₹२,२४,९७४ चं फिक्स व्याज; पाहा डिटेल्स

देशात आर्थिक आघाडीवरून मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. देशाचा किरकोळ महागाई दर मार्चमध्ये ३.३४ टक्क्यांवर घसरला असून, तो गेल्या सहा वर्षांतील नीचांकी स्तर आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून भारतीय अर्थव्यवस्था स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. मंगळवारी त्यांनी कॅश, निर्देशांक आणि शेअर फ्युचर्समध्ये एकूण १३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्याच दिवशी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) १,९५० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केल्यानं बाजारात काहीसा समतोल दिसून आला.

व्यापार करारासाठी अमेरिका तयार

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाला नवं वळण मिळालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व्यापार करारासाठी तयार असल्याचे संकेत दिलेत, पण त्यासाठी चीनला पुढाकार घ्यावा लागेल. त्याचबरोबर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातील अटींवर सहमती झाली असून वर्षअखेरपर्यंत हा करार पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन दिवसांच्या तेजीनंतर अमेरिकी शेअर बाजारात नफावसुली दिसून आली. डाऊ १५५ अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १५० अंकांनी घसरून केवळ ८ अंकांनी घसरून बंद झाला. गिफ्ट निफ्टीही ५० अंकांच्या घसरणीसह २३,२७५ च्या जवळ व्यवहार करत होता. तर डाऊ फ्युचर्समध्येही १२५ अंकांची घसरण पाहायला मिळाली. आशियाई बाजारात निक्केई १५० अंकांनी घसरला.

Web Title: Stock market opens flat PSU banks and realty sectors rise pharma shares fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.