Share Market Opening : भारतीय शेअर बाजार मंगळवारी तेजीसह उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात फ्लॅट व्यवहार करताना दिसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १६७ अंकांच्या वाढीसह ७८,७०७.३७ वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो ४६ अंकांच्या तेजीसह ७८,५७० वर व्यवहार करत होता.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये तर १५ शेअर्स रेड झोनमध्ये होते. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २.६० अंकांच्या वाढीसह २३,७५६ वर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टीचे ५० पैकी १६ शेअर्स ग्रीन झोनमध्ये तर ३४ शेअर्स रेड झोनमध्ये होते.
निफ्टीतील ५० शेअर्सपैकी अदानी एंटरप्रायझेस, बीईएल, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर, पॉवरग्रिड, टायटन, इंडसइंड बँक, एचडीएफसी लाइफ आणि सिप्ला या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी बँक ०.१३ टक्के, निफ्टी ऑटो ०.२८ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.०८ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.२६ टक्के, निफ्टी आयटी ०.३५ टक्के, निफ्टी मीडिया ०.०५ टक्के, निफ्टी मेटल ०.५८ टक्के, निफ्टी फार्मा ०.११ टक्के, निफ्टी पीएसयू बँक ०.०५ टक्के, निफ्टी पीएसयू बँक ०.०५ टक्के, निफ्टी पीएसयू बँक ०.०५ टक्क्यांनी घसरले. निफ्टी प्रायव्हेट बँक ०.१३ टक्के, निफ्टी रियल्टी ०.०५ टक्के, निफ्टी हेल्थकेअर निर्देशांक ०.०२ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.१९ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस ०.२६ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअर ०.३४ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेस ०.४२ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल आयटी अँड टेलिकॉम ०.०७ टक्क्यांनी वधारले.