Stock Market News : भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीने आठवडा संपला. शुक्रवारी (२० डिसेंबर) सपाट सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आणि सलग ५व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. निफ्टी ३६४ अंकांनी घसरून २४,५८७ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ११७६ अंकांनी घसरून ७८,०४१ वर बंद झाला असून निफ्टी बँक ८१६ अंकांनी घसरून ५०,७५९ वर बंद झाला. या पडझडीनंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
सुरवातीला, बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी थोड्या घसरणीसह व्यवहार करत होते. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला. निफ्टी ९ अंकांनी वाढून २३,९६० वर तर बँक निफ्टी १७४ अंकांनी घसरून ५१,४०१ वर उघडला.
कोण ठरलं टॉप गेनर्स
सुरवातीला आयटी शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. त्याचवेळी, तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटो, रियल्टी या निर्देशांकात वाढ झाली. खासगी बँका, पीएसयू बँका, धातू, एफएमसीजी आणि वित्तीय समभागांमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टीवर टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल, एचसीएल टेकमध्ये चांगला फायदा झाला. हे टॉप गेनर्स होते. तर, ॲक्सिस बँक, आयटीसी, पॉवर ग्रिड, एलटी, जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये घसरण झाली.
जागतिक कमकुवत संकेत
जगातील मुख्य शेअर बाजारात घसरण आहे. कालच्या तीव्र घसरणीत एफआयआयने पुन्हा जोरदार विक्री केली. रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्स मिळून ८७०० कोटी रुपयांची विक्री झाली. आज सकाळी गिफ्ट निफ्टी देखील ९३ अंकांनी घसरला आणि २३,९२५ च्या आसपास व्यवहार करत होता. काल, अमेरिकेत अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत GDP डेटा आल्यानंतर, बाजारांनी त्यांची सुरुवातीची ताकद गमावली आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरला. सलग १० दिवसांच्या घसरणीनंतर, डाऊ ४५० अंकांनी घसरला आणि दिवसाच्या उच्चांकापेक्षा फक्त १५ अंकांनी वर बंद झाला, तर नॅस्डॅक २५० अंकांनी घसरला.