Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी घसरणीसह कामकाजाची सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह व्यवहार करत होते. कामकाजादरम्यान सेन्सेक्स २६० अंकांच्या घसरणीसह ७७,९३४ च्या आसपास होता. तर निफ्टी ७० अंकांच्या घसरणीसह २३,६३७ च्या आसपास व्यवहार करताना दिसला. बँक निफ्टी ४७ अंकांच्या घसरणीसह ५०,१५५ च्या पातळीवर उघडला. मिडकॅप १०० निर्देशांक किंचित वाढून ५६,८८६ वर बंद झाला. बाजारात ६२ टक्के बेयरिश आणि ३२ टक्के बुलिश दिसत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निफ्टीवर डॉ. रेड्डी, ओएनजीसी, आयशर मोटर्स, रिलायन्स, पॉवरग्रिड या शेअर्समध्ये तेजी होती. तर टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, विप्रो, एसबीआय लाइफमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. बीएसई सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी केवळ ९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते, उर्वरित २१ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सर्वात मोठी घसरण झोमॅटोमध्ये झाली. त्यानंतर अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, एनटीपीसी, एचयूएल या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. तर रिलायन्स, टीसीएस, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
काल अमेरिकेच्या बाजारात घसरण झाली होती. वरून जीडीपीवाढीचा वेग मंदावण्याचा अंदाज बाजारासाठी नकारात्मक बातमी ठरू शकतो. सरकारनं मंगळवारी आर्थिक वाढीचा अंदाज जाहीर केला. सरकारनं पहिल्या अंदाजात ६.४ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी असू शकतो.