Lokmat Money >शेअर बाजार > अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये...

अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये...

Stock Market News: सेमीकंडक्टर डिव्हाइस आणि मॉड्युल तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 14:13 IST2025-07-10T14:09:48+5:302025-07-10T14:13:46+5:30

Stock Market News: सेमीकंडक्टर डिव्हाइस आणि मॉड्युल तयार करणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Stock Market News: A stock worth just Rs 4.20 gave 64000% return; 1 lakh became Rs 6 crore | अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये...

अवघ्या ४.२० रुपयांच्या स्टॉकने दिला ६४०००% परतावा; १ लाखाचे झाले ६ कोटी रुपये...

Multibagger Stock:शेअर बाजार हा नशिबाचा खेळ आहे, असे म्हटले जाते. यात कधी नुकसान सहन करावे लागते, तर कधी छप्पडफाड कमाईदेखील होते. असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्प आणि दीर्घ कालावधीत बंपर परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत एकेकाळी फक्त ४.२० रुपये होती, परंतु आज त्याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. 

१ लाखाचे झाले ६ कोटी 
या स्टॉकचे नाव IIR पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे. ९ जुलै २०२५ रोजी या स्टॉकची किंमत सुमारे १.३३ टक्क्यांनी घसरून २६९४ रुपयांवर आली. मात्र, दीर्घकाळात याने उत्कृष्ट असा ६४००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

सेमीकंडक्टर उपकरणे आणि सेमीकंडक्टर मॉड्यूल बनवणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये एका वर्षात दहा टक्क्यांनी घट झाली असेल, परंतु गेल्या पाच वर्षांत ८८०० टक्के वाढही झाली आहे. म्हणजेच, जर कोणी पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील अन् आजपर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला ८८ लाखांपेक्षा जास्त परतावा मिळेल.

दीर्घकाळात बनवले करोडपती 
१९ वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत ४.२० रुपये होती, तर आज शेअरची किंमत २६९४ रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच, अशा प्रकारे पाहिले तर, या शेअरने गुंतवणूकदारांना ६४ हजारांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजेच १९ वर्षांपूर्वी जर कोणी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या शेअरची किंमत ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

 

Web Title: Stock Market News: A stock worth just Rs 4.20 gave 64000% return; 1 lakh became Rs 6 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.