Share Market Opening 13 June, 2025: इस्रायल आणि इराणमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे, ज्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारांवर होत आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारही त्याच्या विळख्यात आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स १२६४.१८ अंकांनी घसरून ८०,४२७.८१ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकही ४१५.२० अंकांनी घसरून २४,४७३.०० अंकांवर उघडला. गुरूवारीही शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. काल सेन्सेक्स ८२३.१६ अंकांनी घसरून बंद झाला आणि निफ्टी २५३.२० अंकांनी घसरून बंद झाला.
सर्वच कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये
शुक्रवारी सेन्सेक्सच्या सर्व ३० कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल चिन्हावर व्यवहार करू लागले. मात्र, निफ्टी ५० मधील ५० पैकी केवळ १ शेअर वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडला आणि उर्वरित सर्व ४९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह उघडले. सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सर्वाधिक २.७७ टक्क्यांनी घसरले.
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
बाजारातील घसरणीची प्रमुख कारणं
- भारतीय शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीमागे अनेक मोठी आणि मोठी कारणं आहेत. इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव हे या घसरणीचं सर्वात मोठं कारण आहे. या दोन्ही देशांमधील बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम जगभरातील बाजारपेठांवर होत आहे. इस्रायलनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केलेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलवर हल्ला चढवला आहे. इराण हा कच्च्या तेलाचा प्रमुख निर्यातदार देश आहे.
- इस्रायलबरोबरच इराणचे अमेरिकेशीही संबंध बिघडताना दिसत आहेत. अमेरिकेनं इराणला अणुबॉम्ब बनवू दिले जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
- इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आज ११ टक्क्यांहून अधिक वाढून ७६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम जगभरातील व्यवसायांवर होणार आहे.
- मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.