Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Holidays: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का? एप्रिल महिन्यात केव्हा असतील सुट्ट्या?

Stock Market Holidays: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का? एप्रिल महिन्यात केव्हा असतील सुट्ट्या?

Stock Market Holidays: ३१ मार्च रोजी ईद आणि आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की नाही यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडलाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:48 IST2025-03-29T12:47:12+5:302025-03-29T12:48:44+5:30

Stock Market Holidays: ३१ मार्च रोजी ईद आणि आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की नाही यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडलाय.

Stock Market Holidays Will the stock market remain open on Monday on eid gudhi padwa When will the holidays be in April | Stock Market Holidays: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का? एप्रिल महिन्यात केव्हा असतील सुट्ट्या?

Stock Market Holidays: सोमवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार का? एप्रिल महिन्यात केव्हा असतील सुट्ट्या?

Stock Market Holidays: ३१ मार्च रोजी ईद आणि आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज सुरू राहणार की नाही यासंदर्भात अनेकांना प्रश्न पडलाय. आज शनिवार असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज बंद आहे. तर ३० मार्च रोजी रविवार असल्यानं कामकाज बंद राहिल. त्यामुळे शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही.  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणारे. ज्यामुळे देशांतर्गत शेअर बाजार बंद राहणार आहे. म्हणजेच आता शेअर बाजार थेट १ एप्रिलला उघडेल. गुंतवणूकदारांना आता पुढील आठवड्यात थेट मंगळवारी व्यवहार करता येतील.

सोमवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बीएसईवर स्टॉक, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेटलमेंट होणार नाही. तसंच या कालावधीत कोणताही व्यवहार होणार नाही. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) ३१ मार्च २०२५ रोजी काही काळासाठी खुलं असेल. या एक्स्चेंजवर सकाळी ५ ते रात्री ११.३० किंवा रात्री ११.५५ वाजेपर्यंत व्यवहार होतील. तर या दिवशी नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज पूर्णपणे बंद राहणार आहे.

PPF, सुकन्या समृद्धीसारख्या स्कीमवर आला मोदी सरकारचा निर्णय, पटापट चेक करा नवे व्याजदर

एप्रिल महिन्यात शेअर बाजार कधी बंद राहणार?

पुढील महिन्यात असे एकूण ३ दिवस आहेत जेव्हा देशांतर्गत बाजार बंद राहणार आहे. पहिली सुट्टी १० एप्रिलला महावीर जयंतीच्या निमित्तानं असेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला शेअर बाजाराचं कामकाज बंद राहिल. १८ एप्रिलला गुड फ्रायडेमुळे शेअर बाजाराचं कामकाज होणार नाही. दर आठवड्याला शेअर बाजारात शनिवार आणि रविवारी सुट्टी असते.

मे नंतर ऑगस्टमध्ये सुट्टी

एप्रिलनंतर महाराष्ट्र दिनामुळे मे महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे. जून आणि जुलैमध्ये कोणतेही मोठे सण नसतात. त्यामुळे मे महिन्यानंतरची पुढील सुट्टी थेट १५ ऑगस्टला आहे. तर ऑगस्ट महिन्यात गणेश चतुर्थी असल्यानं २७ तारखेला शेअर बाजार बंद राहिल.

Web Title: Stock Market Holidays Will the stock market remain open on Monday on eid gudhi padwa When will the holidays be in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.