Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > मध्यपूर्वेतील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला, निफ्टी २४,९०० च्या खाली

मध्यपूर्वेतील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला, निफ्टी २४,९०० च्या खाली

Share Market Crash: क्रूड महाग, रुपया कमकुवत; गुंतवणूकदार चिंतेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:30 IST2026-03-02T16:27:46+5:302026-03-02T16:30:19+5:30

Share Market Crash: क्रूड महाग, रुपया कमकुवत; गुंतवणूकदार चिंतेत.

Stock Market Highlights: Middle East tensions hit the market; Sensex falls by 1048 points, Nifty by 24900 points | मध्यपूर्वेतील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला, निफ्टी २४,९०० च्या खाली

मध्यपूर्वेतील तणावाचा बाजाराला फटका; सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला, निफ्टी २४,९०० च्या खाली

Share Market Crash: मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावाचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आजच्या(दि.२) व्यवहारात सेन्सेक्समध्ये १,६०० अंकांहून अधिक घसरण झाली, तर निफ्टी ५०० अंकांनी कोसळत ३४,७०० च्या खाली गेला. शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला आहे.

गुंतवणूकदारांचे १७.५० लाख कोटी रुपये बुडाले

आकडेवारीनुसार, शुक्रवारी बीएसईचे बाजार भांडवल ४,६३,५०,६७१.२७ कोटी रुपये होते. मात्र, सोमवारी बाजार उघडताच ते ४,४५,९१,६६०.६० कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ असा की, काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे १७,५९,०१०.६७ कोटी रुपये बुडाले. तसेच, या संघर्षाचा भारतीय रुपयावरही परिणाम होत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊन प्रति डॉलर ९१ वर पोहोचला आहे. 

या शेअर्समध्ये जोरदार घसरण

L&T

इंटरग्लोब एव्हिएशन

अदानी पोर्ट्स

टाटा मोटर्स (पॅसेंजर व्हेईकल्स)

अदानी एंटरप्रायझेस

हे शेअर्स वधारले

भारत इलेक्ट्रॉनिक्स

सन फार्मा

ONGC

डॉ. रेड्डीज लॅब्स

हिंदाल्को

बाजार घसरणीची प्रमुख कारणे

  • कमकुवत जागतिक संकेत आणि युद्धाचा ताण

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक चिघळली आहे. या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल इराणने संपूर्ण परिसरात मिसाइल हल्ले केल्याने संघर्षाचा विस्तार होण्याची भीती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूड सोमवारी ७% हून अधिक वाढून सुमारे ८२.४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. ही गेल्या १४ महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढली.

कच्चे तेल महाग झाल्याने ऑइल मार्केटिंग, पेंट, टायर, एव्हिएशन आणि केमिकल कंपन्यांचे शेअर्स दबावाखाली आले. याशिवाय, हॉर्मुज जलडमरूमध्यातून समुद्री वाहतूक बंद करण्याची घोषणा झाल्याने चिंता वाढली आहे. या मार्गाने जागतिक क्रूड पुरवठ्याचा सुमारे २०% आणि भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी ४०% हून अधिक हिस्सा येतो.

  • रुपया कमकुवत, बॉण्ड यिल्ड वाढली

युद्धाच्या सावटात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला, तर सरकारी बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाली. इतर आशियाई चलनांत ०.२% ते ०.६% घसरण दिसली; MSCI आशिया-पॅसिफिक निर्देशांक सुमारे १.५% घसरला. डॉलर इंडेक्स ९७.९ वर राहिला. रॉयटर्सनुसार, RBI रुपयाला ९१.९८ या विक्रमी नीचांकी पातळीपासून रोखण्यासाठी हस्तक्षेप करू शकतो, अशी बाजारात अपेक्षा आहे.

(विशेष सूचना- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : मध्य पूर्व तनाव से बाजार धराशायी; सेंसेक्स 1048, निफ्टी 24900 अंक नीचे

Web Summary : मध्य पूर्व तनाव के कारण शेयर बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स 1048 अंक गिरा, निफ्टी 24900 से नीचे। निवेशकों को ₹17.5 लाख करोड़ का नुकसान हुआ। कच्चे तेल की कीमतें बढ़ीं, जिससे रुपया कमजोर हुआ। एलएंडटी और अडानी पोर्ट्स के शेयरों में भारी गिरावट।

Web Title : Middle East tensions crash markets; Sensex down 1048, Nifty 24900

Web Summary : Middle East tensions triggered a stock market crash. Sensex plunged 1048 points, Nifty fell below 24900. Investors lost ₹17.5 lakh crore. Crude oil prices surged, weakening the Rupee. L&T and Adani Ports shares saw major declines.