Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे ₹६.३ लाख कोटी बुडाले; कारण काय..?

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे ₹६.३ लाख कोटी बुडाले; कारण काय..?

Stock Market Crash: जाणून घ्या या घसरणीचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:49 IST2026-02-24T15:49:00+5:302026-02-24T15:49:40+5:30

Stock Market Crash: जाणून घ्या या घसरणीचे कारण...

Stock Market Crash: investors lose ₹6.3 lakh crore; What is the reason..? | शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे ₹६.३ लाख कोटी बुडाले; कारण काय..?

शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांचे ₹६.३ लाख कोटी बुडाले; कारण काय..?

Stock Market Crash: शेअर बाजारात आज (२४ फेब्रुवारी) जोरदार घसरण पाहायला मिळाली. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मोठ्या दबावाखाली राहिले. बीएसई सेन्सेक्स १,३०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी १.३% घसरून २५,३८७ वर आला. 

विक्रीचा दबाव केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित न राहता, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही सुमारे १% घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ६.३ लाख कोटी रुपयांची घट झाली. 

बाजार का घसरतोय?

1) अमेरिकेतील अनिश्चितता 

बाजारातील घसरणीमागे अमेरिकेशी संबंधित अनिश्चितता हे प्रमुख कारण मानले जात आहे. अलीकडेच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला रद्दबातल ठरवले होते. मात्र त्यानंतर ट्रम्प प्रशासन अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. माहितीनुसार, १९६२च्या ट्रेड एक्स्पान्शन अ‍ॅक्टच्या सेक्शन २३२ अंतर्गत नव्याने टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे. तसेच ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या स्टेट ऑफ द युनियन भाषणाकडे जागतिक बाजारांचे लक्ष लागले आहे. टॅरिफबाबत कठोर भूमिका घेतली गेल्यास जागतिक व्यापार आणि उभरत्या बाजारांवर दबाव वाढू शकतो, अशी गुंतवणूकदारांची भीती आहे.

2) अमेरिका-इराण तणावात वाढ

दुसरी मोठी चिंता म्हणजे अमेरिका आणि इराणमधील वाढता भू-राजकीय तणाव. इराणमधील आंदोलनं आणि सरकारची कठोर कारवाई यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. अमेरिकेनेही इराणला लष्करी कारवाईची चेतावणी दिली आहे. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अणु चर्चेआधी अनिश्चितता अधिक वाढली असून, याचा परिणाम जागतिक बाजारांवर होताना दिसतो. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही जाणवत आहे.

3) आयटी क्षेत्रात मोठी घसरण

आयटी क्षेत्रातील जोरदार विक्रीने बाजाराची कंबर मोडली. निफ्टी आयटी निर्देशांक इंट्राडेमध्ये सुमारे ४% घसरला, तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत जवळपास २०% घसरण नोंदवली गेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव, अमेरिकेतील उच्च व्याजदर आणि आयटी कंपन्यांच्या ADR मधील कमजोरी यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. आयटी कंपन्यांचे सेन्सेक्स आणि निफ्टीमधील वजन जास्त असल्याने या घसरणीचा निर्देशांकांवर थेट परिणाम झाला.

4) कच्चे तेल महाग, डॉलर मजबूत

याशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरची मजबुती हेही बाजारासाठी नकारात्मक संकेत ठरत आहेत. ब्रेंट क्रूड ७२ डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले असून, ते सहा महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ आहे. भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशासाठी महाग तेल म्हणजे महागाई आणि चालू खात्यातील तुटीची चिंता. दुसरीकडे, डॉलर निर्देशांक मजबूत राहिल्यास परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) ओघ कमी होण्याची शक्यता आहे. अलीकडे एफआयआय खरेदीकडे वळले होते; मात्र डॉलर अधिक मजबूत झाल्यास भांडवल बाहेर जाण्याचा धोका वाढू शकतो.

पुढील काळात काय?

या सर्व पार्श्वभूमीवर बाजारात काही काळ चढ-उतार कायम राहण्याचे संकेत आहेत. गुंतवणूकदारांनी जागतिक घडामोडी, टॅरिफ धोरणे, कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलरची दिशा यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

(विशेष सूचना- हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने असून, गुंतवणूकीचा सल्ला समजू नये. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आर्थतज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title : शेयर बाजार में हाहाकार: निवेशकों को ₹6.3 लाख करोड़ का नुकसान; कारण?

Web Summary : भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट, निवेशकों के ₹6.3 लाख करोड़ डूबे। वैश्विक अनिश्चितताएं, अमेरिका-ईरान तनाव, आईटी क्षेत्र में गिरावट, कच्चे तेल की बढ़ती कीमतें और मजबूत डॉलर बाजार में गिरावट के मुख्य कारण बताए गए हैं। विशेषज्ञों ने सावधानी बरतने की सलाह दी है।

Web Title : Stock Market Crash: Investors Lose ₹6.3 Lakh Crore; Reasons?

Web Summary : Indian stock markets crashed, wiping out ₹6.3 lakh crore of investor wealth. Global uncertainties, US-Iran tensions, IT sector decline, rising crude oil prices, and a stronger dollar are cited as key reasons for the market downturn. Experts advise caution.