Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Crash: हे काय... जपान ते कोरियापर्यंत सुस्साट, पण आपटला भारतीय शेअर बाजार; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

Stock Market Crash: हे काय... जपान ते कोरियापर्यंत सुस्साट, पण आपटला भारतीय शेअर बाजार; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:01 IST2026-01-12T10:01:37+5:302026-01-12T10:01:37+5:30

Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले.

Stock Market Crash From Japan to Korea everything is fine but the Indian stock market is in trouble Sensex Nifty see big decline | Stock Market Crash: हे काय... जपान ते कोरियापर्यंत सुस्साट, पण आपटला भारतीय शेअर बाजार; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

Stock Market Crash: हे काय... जपान ते कोरियापर्यंत सुस्साट, पण आपटला भारतीय शेअर बाजार; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात खराब झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स उघडल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत ५२५ अंकांपेक्षा जास्त घसरला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील सेन्सेक्सप्रमाणेच घसरणीसह उघडला आणि अचानक १५० अंकांनी घसरला. विशेष म्हणजे बाजारात ही घसरण अशा वेळी दिसून आली आहे जेव्हा सर्व आशियाई बाजार ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. जपानचा निक्केई असो किंवा हाँगकाँगचा हँगसेंग असो, सर्वातच तेजी दिसून येत आहे.

सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण

सोमवारी जागतिक शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत होते, कारण जवळजवळ सर्व आशियाई बाजार वाढीसह व्यवहार करत होते. तथापि, जेव्हा सेन्सेक्स-निफ्टी उघडले तेव्हा परिस्थिती उलटी झाल्याचं दिसून आलं. बीएसई सेन्सेक्स ८३,४३५.३१ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ८३,५७६.२४ पासून खाली आला आणि काही मिनिटांतच तो ५२५ पेक्षा जास्त अंकांनी घसरून ८३,०४३ वर व्यवहार करत होता.\

नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या

सेन्सेक्सप्रमाणेच, एनएसई निफ्टीलाही सुरुवातीच्या सत्रात वाईट सुरुवातीचा सामना करावा लागला. ५०-शेअर्सचा एनएसई निर्देशांक २५,६६९.०५ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद २५,६८३.३० पासून खाली आला आणि नंतर त्याची घसरण सुरूच राहिली, कामकाजादरम्यान तो १५० पेक्षा जास्त अंकांनी घसरून २५,५२९ वर आला.

या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स घसरले

शेअर बाजार घसरणीसह उघडला आणि अनेक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स घसरलेले दिसून आले. बीएसई लार्ज-कॅप श्रेणीमध्ये, बीईएल शेअर (१.७०%), अदानी पोर्ट्स शेअर (१.५०%) आणि पॉवरग्रिड शेअर (१.२०%) कमी व्यवहार करत होते. मिड-कॅप श्रेणीमध्ये, भेल शेअर (४%), आयपीकॅलॅब शेअर (३.३०%), ओला इलेक्ट्रिक शेअर (३.२०%), पॉवरइंडिया शेअर (२.९०%) आणि यूबीएल शेअर (२.७५%) कमी व्यवहार करत होते. स्मॉल-कॅप समभागांमध्ये, केर्नेक्स शेअर (१२%) आणि तेजस नेटवर्क शेअर (८%) घसरले.

Web Title : एशियाई बाजारों में तेजी के बावजूद भारतीय शेयर बाजार में गिरावट; सेंसेक्स, निफ्टी लुढ़के

Web Summary : एशियाई बाजारों में सकारात्मक रुझानों के बावजूद भारतीय शेयर बाजार में गिरावट आई। सेंसेक्स और निफ्टी में भारी गिरावट दर्ज की गई। कई बड़ी कंपनियों के शेयर भी गिरे, जिससे लार्ज, मिड और स्मॉल-कैप श्रेणियों पर असर पड़ा।

Web Title : Indian Stock Market Crashes Despite Asian Markets Surge; Sensex, Nifty Fall

Web Summary : Indian stock market faced a downturn despite positive trends in Asian markets. Sensex and Nifty opened lower, with significant drops. Several major company shares also declined, impacting large, mid, and small-cap categories.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.