Lokmat Money >शेअर बाजार > तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

Share Market : बुधवारच्या वाढीमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि आरआयएलच्या शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:26 IST2025-05-21T16:26:23+5:302025-05-21T16:26:46+5:30

Share Market : बुधवारच्या वाढीमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि आरआयएलच्या शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली.

stock market closing sensex nifty share market top gainers losers | तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

Share Market : गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज, बुधवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोन्ही निर्देशांक आज दमदार वाढीसह बंद झाले. बाजारातील या उसळीमुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संरक्षण क्षेत्रातही आज वाढ पाहायला मिळाली.

आज दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्स ४१० अंकांनी वाढून ८१,५९७ वर बंद झाला, तर निफ्टी १३० अंकांनी वाढून २४,८१३ वर पोहोचला. या वाढीमध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कोणते शेअर्स वधारले?
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक २.०२ टक्क्यांनी वधारले. याशिवाय, टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि टाटा मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही चांगली वाढ झाली.

निफ्टी ५० मधील ५० पैकी ३७ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या चिन्हावर (वाढीसह) बंद झाले. मिडकॅप (Midcap) निर्देशांकही ४३७ अंकांनी वाढून ५६,६२० वर पोहोचला, ज्यामुळे बाजारात खरेदीचे वातावरण निर्माण झाले.

संरक्षण आणि फार्मा क्षेत्रात उत्साह
आज संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये पुन्हा खरेदीचा जोर दिसला. बीईएल (BEL) आणि सोलर इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांच्या मजबूत कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. यासोबतच, फार्मा (औषध) क्षेत्रातील शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून आली.

वाचा - अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
आजच्या तेजीमध्येही काही शेअर्समध्ये घसरण दिसली. यामध्ये कोटक महिंद्रा बँक, पॉवर ग्रिड, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण दिसले आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला.

Web Title: stock market closing sensex nifty share market top gainers losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.