Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!

सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!

Stock Market Closing: शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. परंतु, आज बाजारात खालच्या पातळींवरून सुधारणा दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:11 IST2025-11-07T17:11:05+5:302025-11-07T17:11:05+5:30

Stock Market Closing: शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. परंतु, आज बाजारात खालच्या पातळींवरून सुधारणा दिसून आली.

Stock Market Closes Flat-to-Negative Nifty Settles Below 25,500 Amid High Volatility | सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!

सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!

Stock Market : चालू आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शुक्रवारी शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद झाला. दिवसभर बाजारात मोठे चढ-उतार दिसून आले; एका क्षणी सेन्सेक्सने ६०० अंकांची तर निफ्टीने २५,३५० च्या खालील पातळी गाठली होती. मात्र, शेवटच्या सत्रात महत्त्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर झालेल्या खरेदीमुळे बाजाराने जोरदार रिकव्हरी केली. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ९४.७३ अंकांनी (०.११%) तुटून ८३,२१६.२८ च्या पातळीवर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० इंडेक्स १७.४१ अंकांनी (०.०७%) घसरून २५,४९२.३० च्या पातळीवर स्थिरावला.

रिकव्हरीला खरेदीचा आधार
बाजार सुरुवातीच्या सत्रातील मोठ्या घसरणीतून सावरला, कारण महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर खरेदी सुरू झाली. मात्र, केवळ या रिकव्हरीवरून बाजाराचा ट्रेंड लगेच बदलला असे म्हणणे घाईचे ठरेल, कारण तिमाही निकालांमध्ये असलेली संमिश्रता, जागतिक बाजारपेठेतील सावध पवित्रा आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री हे घटक अजूनही बाजारात दबाव ठेवून आहेत.

PSU बँकांनी गुंतवणूकदारांना केले आकर्षित
काही क्षेत्रांना त्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे चांगला आधार मिळाला. विशेषतः वित्तीय क्षेत्रात जोरदार तेजी दिसून आली. पीएसयू बँकांमध्ये मोठी तेजी आली, कारण या क्षेत्रातएफडीआय मर्यादा वाढवण्याच्या आणि बँकांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. तज्ज्ञांच्या मते, आता बाजाराचे लक्ष अमेरिकेतील शटडाउन, टॅरिफच्या बातम्या आणि अमेरिका-भारत तसेच अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार करारावर असेल. या करारांवरच पुढील तेजीचा काळ अवलंबून असेल.

आजचे टॉप गेनर्स स्टॉक

कंपनीचे नाववाढ (टक्क्यांमध्ये)
बजाज फायनान्स२.३८%
टाटा स्टील२.३२%
महिंद्रा अँड महिंद्रा१.९९%
बजाज फिनसर्व१.८९%
आयसीआयसीआय बँक१.७२%

आजचे टॉप लूजर्स स्टॉक

कंपनीचे नावघसरण (टक्क्यांमध्ये)
भारती एअरटेल४.४८%
टेक महिंद्रा१.९१%
रिलायन्स इंडस्ट्रीज१.२१%
एचसीएल टेक ०.९२% 

 

Web Title : सेंसेक्स, निफ्टी लाल निशान में बंद; पीएसयू बैंकों में तेजी।

Web Summary : शेयर बाजार अस्थिर कारोबार के बाद मामूली गिरावट के साथ बंद हुआ। एफडीआई सीमा में वृद्धि और बैंक विलय की चर्चा के बीच पीएसयू बैंकों ने निवेशकों को आकर्षित किया। अब ध्यान अमेरिकी शटडाउन और व्यापार समझौतों पर।

Web Title : Sensex, Nifty close in red; PSU banks gain amid market volatility.

Web Summary : Stock market closed slightly lower after volatile trading. PSU banks attracted investors amid discussions of FDI limit increases and bank mergers. Focus shifts to US shutdown news and trade agreements.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.