Lokmat Money >शेअर बाजार > रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाला शेअर बाजार; आयटी शेअर्समधील विक्रीमुळे Sensex-Nifty वर दबाव

रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाला शेअर बाजार; आयटी शेअर्समधील विक्रीमुळे Sensex-Nifty वर दबाव

शेअर बाजारात आज किरकोळ वाढीसह कामकाज सुरू झालं, पण अल्पावधीतच दबाव दिसून आला. दिवसभरातील चढ-उतारानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:19 IST2025-03-12T16:19:29+5:302025-03-12T16:19:29+5:30

शेअर बाजारात आज किरकोळ वाढीसह कामकाज सुरू झालं, पण अल्पावधीतच दबाव दिसून आला. दिवसभरातील चढ-उतारानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाले.

Stock market closes flat in red zone Sensex Nifty under pressure due to selling in IT shares | रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाला शेअर बाजार; आयटी शेअर्समधील विक्रीमुळे Sensex-Nifty वर दबाव

रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाला शेअर बाजार; आयटी शेअर्समधील विक्रीमुळे Sensex-Nifty वर दबाव

शेअर बाजारात आज किरकोळ वाढीसह कामकाज सुरू झालं, पण अल्पावधीतच दबाव दिसून आला. दिवसभरातील चढ-उतारानंतर निफ्टी आणि सेन्सेक्स रेड झोनमध्ये फ्लॅट लेव्हलवर बंद झाले. सेन्सेक्स ४७.८७ अंकांनी घसरून ७४,०४९.६५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक २७.९६ अंकांनी घसरून २२,४६९.९५ वर बंद झाला. आजच्या व्यवसायात आयटी क्षेत्रात मोठी घसरण झाली असून, रेड झोनमध्ये बाजार बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये आजच्या व्यवहारात सर्वात मोठी वाढ झाली असून तो ४.३९ टक्क्यांनी वधारून ६८४.७० वर बंद झाला, तर टाटा मोटर्सचा शेअर ३.१३ टक्क्यांनी वधारून ६६८.३० वर बंद झाला. त्यानंतर कोटक बँकेचा शेअर २.४५ टक्क्यांनी वधारून १,९८३ रुपयांवर, तर बजाज फायनान्सचा शेअर १.७३ टक्क्यांनी वधारून ८,४८४ रुपयांवर आणि आयटीसी १.५३ टक्क्यांच्या वाढीसह ४१२.४० रुपयांवर बंद झाला.

दुसरीकडे, इन्फोसिसचे शेअर्स ४.२६ टक्क्यांनी घसरून १,५९१ च्या पातळीवर बंद झाले, तर विप्रोचा शेअर ३.३२ टक्क्यांनी घसरून २६८.५५ वर, टेक महिंद्राचा शेअर २.७७ टक्क्यांनी घसरून १,४३८ रुपयांवर बंद झाला. तर नेस्ले इंडियाचा शेअर २.४९ टक्क्यांनी घसरून २,१९६ रुपयांवर बंद झाला. याशिवाय टीसीएसचा शेअर १.९४ टक्क्यांनी घसरून ३,५०६ च्या पातळीवर बंद झाला आहे.

खासगी बँकांत मोठी तेजी

आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खासगी बँकांच्या शेअर्समध्ये चांगली उसळी पाहायला मिळाली, ज्यामुळे निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स ०.७४% वाढीसह २३,९९० च्या टॉपवर बंद झाला. निफ्टी फार्मा निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी वधारून २०,४२४ च्या पातळीवर बंद झाला. बँक निफ्टी ०.४२ टक्क्यांच्या वाढीसह ४८,०५७ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली आहे आणि तो २.९१ टक्क्यांनी घसरून ३६,३११ च्या पातळीवर बंद झाला.

Web Title: Stock market closes flat in red zone Sensex Nifty under pressure due to selling in IT shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.