Lokmat Money >शेअर बाजार > ८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : शेअर बाजारातील घसरण अखेर थांबली आहे. सोमवारी, ८ दिवसांच्या घसरणीनंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:26 IST2025-02-17T16:25:55+5:302025-02-17T16:26:26+5:30

Share Market Update : शेअर बाजारातील घसरण अखेर थांबली आहे. सोमवारी, ८ दिवसांच्या घसरणीनंतर, सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले.

stock market closed in green sensex below 76000 nifty at 22960 | ८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

८ दिवसांनंतर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! 'या' ५ शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बाजार बंद होताना आशेचा किरण दिसला आहे. सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी बँक ४८,७०० च्या खाली तर निफ्टी सुमारे १५० अंकांनी घसरला. सेन्सेक्स जवळपास ६०० अंकांनी घसरला होता. पण सुरुवातीची घसरण बरोबर १० वाजता पलटली. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात देशांतर्गत शेअर बाजार अखेर हिरव्या रंगात बंद झाला आणि ८ दिवसानंतर घसरणीला ब्रेक लागला.

सेन्सेक्स, निफ्टी ८ दिवसांच्या घसरणीनंतर वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये देखील चांगली रिकव्हरी झाली आहे. निफ्टी बँक तळापासून सुमारे ७५० अंकांच्या सुधारणेसह बंद झाला. फार्मा, मेटल, PSE समभागांमध्ये खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. ऑटो, आयटी, एफएमसीजी शेअर्स दबावाखाली आहेत. अखेर निफ्टी ३० अंकांनी वाढून २२,९६० वर बंद झाला. तर सेन्सेक्स ५८ अंकांनी वाढून ७५,९९७ वर बंद झाला. निफ्टी बँक १५९ अंकांनी वधारून ४९,२५९ वर बंद झाला. तर मिडकॅप १९६ अंकांनी वाढून ४९,८५० वर बंद झाला.

निफ्टीवरील टॉप ५ शेअर
अदानी एन्टरटेनमेंट
बजाज फिनसर्व
इंडसइंड बँक
पॉवरग्रिड
अदानी पोर्ट्स

जागतिक बाजारपेठेत काय घडलं?
सोमवारी जागतिक शेअर बाजारात संमिश्र कल होता. गुंतवणूकदार सतत आर्थिक डेटा आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक कृतींवर लक्ष ठेवत आहेत, कारण दोन्ही मध्यवर्ती बँकेच्या आगामी हालचालींवर प्रभाव टाकू शकतात. फ्रान्सचा CAC ४० सुरुवातीच्या व्यापारात सुमारे ०.१% घसरून ८,१७१.५९ वर आला, तर जर्मनीचा DAX ०.४% वाढून २२,५६०.०० वर आला. ब्रिटनचा FTSE १०० ०.१% वाढून ८,७४२.९७ वर पोहोचला.

परकीय गुंतवणूकदारांची नफावसुली : अर्थमंत्री
परकीय गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार घसरत आहे. यावर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की परकीय गुंतवणूकदार नफावसुली करत असल्याने देशातून पैसे काढून घेत आहेत. मात्र, ही स्थिती अल्पकालीन असल्याने अर्थमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: stock market closed in green sensex below 76000 nifty at 22960

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.