Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी

बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी

Share Market Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर, आज, २३ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार जवळजवळ स्थिर राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:17 IST2025-12-23T17:17:09+5:302025-12-23T17:17:09+5:30

Share Market Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर, आज, २३ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार जवळजवळ स्थिर राहिले.

Stock Market Close Dec 23 Sensex Dips Slightly, Nifty Flat; Investors Gain ₹30,000 Crore | बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी

बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी

Share Market Today : सलग दोन दिवसांच्या तुफानी तेजीनंतर आज २३ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात काहीशी शांतता पाहायला मिळाली. नफावसुली आणि निफ्टीच्या एक्स्पायरीमुळे बाजारात दिवसभर चढ-उतार सुरू होते. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ४२.६३ अंकांच्या (०.०५%) किरकोळ घसरणीसह ८५,५२४.८४ वर बंद झाला, तर निफ्टी ४.७५ अंकांच्या (०.०१%) अल्प वाढीसह २६,१७७.१५ च्या पातळीवर स्थिरावला.

बाजार जरी सपाट दिसत असला तरी ब्रॉडर मार्केटमध्ये मात्र तेजी कायम होती. बीएसई मिडकॅपमध्ये ०.०७ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये ०.३८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. छोट्या शेअर्समधील या खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३०,००० कोटी रुपयांची भर पडली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७५.३२ लाख कोटींवरून वाढून ४७५.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कोणत्या क्षेत्राची दमदार कामगिरी
क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार करता आज संमिश्र कल पाहायला मिळाला. आयटी, फार्मा, सरकारी बँका आणि रियल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिला. विशेषतः इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. दुसरीकडे, मेटल, युटिलिटी आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्सना गुंतवणूकदारांनी पसंती दिली. 'आयटीसी'चा शेअर १.२७ टक्क्यांच्या वाढीसह सेन्सेक्समध्ये टॉप गेनर ठरला, तर अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टीलमध्येही चांगली वाढ झाली.

वाचा - सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...

मुंबई शेअर बाजारात आज एकूण ४,३६५ शेअर्समध्ये व्यवहार झाले. यामध्ये वाढणाऱ्या शेअर्सचे पारडे जड राहिले असून २,२९१ शेअर्स हिरव्या निशाणात बंद झाले, तर १,८९३ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, आज १०७ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ८५ शेअर्सनी वर्षातील नीचांकी पातळी गाठली. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि निवडक सेक्टरमधील नफावसुली यामुळे बाजाराने आज विश्रांती घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Web Title : बाजार सपाट बंद; सेंसेक्स में मामूली गिरावट, निवेशकों ने कमाए ₹30,000 करोड़

Web Summary : लगातार दो दिनों की तेजी के बाद, भारतीय शेयर बाजार सपाट बंद हुआ, सेंसेक्स में मामूली गिरावट आई। व्यापक बाजार में तेजी रही, जिससे निवेशकों की संपत्ति में ₹30,000 करोड़ की वृद्धि हुई। आईटी और फार्मा में बिकवाली का दबाव; मेटल और एफएमसीजी में लाभ।

Web Title : Flat Market Close; Investors Earn ₹30,000 Crore Despite Sensex Dip

Web Summary : After two days of gains, Indian stock market saw a flat close with minor Sensex decline. Broader market rose, adding ₹30,000 crore to investor wealth. IT and Pharma faced selling pressure; Metal and FMCG gained.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.