Share Market Opening 20 October, 2025: सोमवारी, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजारानं चांगल्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. आज बीएसई सेन्सेक्स ३१७.११ अंकांनी (०.३८%) वाढून ८४,२६९.३० अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्स देखील ११४.७५ अंकांच्या (०.४५%) चांगल्या वाढीसह २५,८२४.६० अंकांवर व्यवहाराला सुरुवात केली. आज दिवाळीच्या दिवशीही देशांतर्गत शेअर बाजारात इतर दिवसांप्रमाणेच व्यवहार होणार आहे. मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी बाजारात एक तासाचं 'मुहूर्त ट्रेडिंग सेशन' आयोजित केलं जाईल आणि बुधवारी शेअर बाजाराला सुट्टी असेल.
बहुतांश शेअर्सची सकारात्मक सुरुवात
सोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांचे समभाग वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले, तर उर्वरित ४ कंपन्यांच्या शेअर्सनं घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. त्याचप्रमाणे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी ४६ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित ४ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज सर्वाधिक २.४५ टक्क्यांनी वाढले आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.५१ टक्क्यांनी घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.
या शेअर्समध्ये जोरदार तेजी
आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्समधील उर्वरित कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँकचे शेअर्स २.२३ टक्के, ॲक्सिस बँक २.१५ टक्के, बजाज फायनान्स १.२८ टक्के, टायटन १.१८ टक्के, बजाज फायनान्स १.१७ टक्के, इन्फोसिस १.०५ टक्के, भारती एअरटेल ०.८६ टक्के, एलएंडटी ०.७९ टक्के, एचडीएफसी बँक ०.७५ टक्के, एसबीआय ०.७४ टक्के, बीईएल ०.७३ टक्के, टीसीएस ०.६५ टक्के, सन फार्मा ०.६५ टक्के, अदानी पोर्ट्स ०.६४ टक्के, मारुती सुझुकी ०.६१ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.५६ टक्के, पॉवरग्रिड ०.५४ टक्के, टाटा मोटर्स ०.५२ टक्के, आयटीसी ०.४४ टक्के, एचसीएल टेक ०.४४ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.४२ टक्के, एशियन पेंट्स ०.२६ टक्के, एटर्नल ०.१९ टक्के, एनटीपीसी ०.१३ टक्के आणि ट्रेंटचे समभाग ०.०५ टक्क्यांच्या वाढीसह उघडले.
या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, टाटा स्टीलचे शेअर्स आज ०.३८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स ०.२४ टक्के आणि टेक महिंद्राचे शेअर्सची ०.०९ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.