Lokmat Money >शेअर बाजार > GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

GST New Slabs: बुधवारी जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांचा गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम दिसून आला. शेअर बाजारानं आज जबरदस्त तेजीसह व्यवहार सुरू केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 10:01 IST2025-09-04T10:01:11+5:302025-09-04T10:01:11+5:30

GST New Slabs: बुधवारी जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांचा गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम दिसून आला. शेअर बाजारानं आज जबरदस्त तेजीसह व्यवहार सुरू केले.

Stock market buoyant after GST rate cut Sensex rises by 547 points these stocks surge | GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

GST New Slabs: बुधवारी जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांचा गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम दिसून आला. शेअर बाजारानं आज जबरदस्त तेजीसह व्यवहार सुरू केले. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स ५७३.९६ अंकांच्या जोरदार वाढीसह ८१,१४१.६७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी देखील १६२.०५ अंकांच्या वाढीसह २४,८७७.१० च्या पातळीवर व्यवहार करत होता.

निफ्टीमध्ये एम अँड एम, बजाज फायनान्स, आयशर मोटर्स, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, एचयूएल, आयटीसी यामध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे, कोल इंडिया, इटरनल, विप्रो, हिंडाल्को, टाटा स्टील, इंडसइंड बँक यांचे शेअर घसरले.

पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?

मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स ८८९ अंकांनी वाढून ८१,४५६ वर उघडला. निफ्टी २६५ अंकांनी वाढून २४,९८० वर उघडला. बँक निफ्टी ३१२ अंकांनी वाढून ५४,३७९ वर उघडला आणि चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८८.०३/ डॉलर्सवर व्यवहार करताना दिसला.

सणासुदीपूर्वी, सामान्य माणूस आणि उद्योग दोघांसाठीही दिलासा देणारी एक मोठी बातमी आली आहे. जीएसटी कौन्सिलच्या १० तासांच्या मॅरेथॉन बैठकीत सरकारनं कर रचनेत ऐतिहासिक सुधारणांना मान्यता दिली. सर्व राज्यांच्या संमतीनं, आता फक्त १८% आणि ५% असे दोन जीएसटी स्लॅब असतील. नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील. यापूर्वी गिफ्ट निफ्टी १६५ अंकांनी वाढ नोंदवत होता. निर्देशांक २४,९७७ च्या पातळीवर होता.

जागतिक बाजारपेठेचा कल

अमेरिकन बाजारपेठेत सुधारणा दिसून आली. सुरुवातीच्या घसरणीतून डाओ जोन्स सावरला आणि ३०० अंकांनी सुधारला परंतु शेवटी २५ अंकांनी घसरून बंद झाला. नॅस्डॅकनं २०० अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. आशियाई बाजारांबद्दल बोलायचं झालं तर, जपानचा निक्केई ५०० अंकांनी वाढून मजबूत दिसला तर डाउ फ्युचर्स स्थिर राहिले. दरम्यान, जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं इशारा दिलाय की जर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफमुळे महागाई वाढली तर या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत मंदीची शक्यता आहे.

Web Title: Stock market buoyant after GST rate cut Sensex rises by 547 points these stocks surge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.