Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी

शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ५४७ अंकांनी वधारून ८०,१४२ वर उघडला. आज सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ८० हजारांचा जादुई आकडा ओलांडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:54 IST2025-04-23T09:54:30+5:302025-04-23T09:54:30+5:30

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ५४७ अंकांनी वधारून ८०,१४२ वर उघडला. आज सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ८० हजारांचा जादुई आकडा ओलांडला.

Stock market bull rally Sensex crosses 80 thousand Nifty rises by 190 points Buying in IT stocks | शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी

शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी

Stock Market Today: शेअर बाजारात आज पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स ५४७ अंकांनी वधारून ८०,१४२ वर उघडला. आज सेन्सेक्सनं पुन्हा एकदा ८० हजारांचा जादुई आकडा ओलांडला. निफ्टी १९० अंकांनी वधारून २४,३५७ वर उघडला. बँक निफ्टी ४५० अंकांनी वधारून ५६,०९७ वर उघडला. तर, ८५.२६/डॉलरवर उघडला. निफ्टी आयटी निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात ३ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही आज जोरदार खरेदी पाहायला मिळाली. सेक्टोरल इंडेक्समध्ये आज निफ्टी, ऑटो आणि रियल्टी सेक्टरमध्येही तेजी दिसून आली.

कामकाजादरम्यान एचसीएलटेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टीसीएसच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.

पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१

या बातमीमुळे दिलासा

अमेरिका आणि चीनमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या टॅरिफ वॉरसंदर्भात मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी व्यापारयुद्ध लवकरच मिटण्याचे संकेत दिलेत. या सकारात्मक विधानानंतर चार दिवसांच्या घसरणीनंतर अमेरिकी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. डाऊ फ्युचर्स ५०० अंकांनी वधारले, तर आशियाई बाजारांमध्येही तेजी दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक ६५० अंकांनी वधारला तर निफ्टी २०० अंकांनी वधारून २४,४०० च्या पातळीवर पोहोचला.

ट्रम्प यांचा सूर बदलला

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडचे अध्यक्ष पॉवेल यांच्याबाबतच्या बदललेल्या सूरामुळे बदलामुळेही बाजाराची धारणा मजबूत झाली. फेडच्या अध्यक्षांना हटविण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आणि सध्याचा काळ व्याजदरात कपात करण्याची योग्य वेळ असल्याचं सांगितलं. या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा उंचावला आहे. टॅरिफ वॉर कमी होण्याच्या आशेनं सोन्यात नफावसुली दिसून आली. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव ९९,३५८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर २,००० रुपयांनी घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं १२५ डॉलरनं घसरून ३,३७५ डॉलरवर आलं. दुसरीकडे, कच्च्या तेलाचे दर दोन टक्क्यांनी वधारून ६८ डॉलरच्या जवळपास पोहोचले.

Web Title: Stock market bull rally Sensex crosses 80 thousand Nifty rises by 190 points Buying in IT stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.