Shriram Finance Stock Split News: नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) श्रीराम फायनान्सच्या शेअरमध्ये आज दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढण्यामागचे कारण म्हणजे शेअर स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारखेची घोषणा. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर २.८६ टक्क्यांनी वधारून २,९५३.९० रुपयांवर होता.
रेकॉर्ड डेट कधी?
आज, २३ डिसेंबर रोजी कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटलंय की, या स्टॉक स्प्लिटनंतर ५ रुपयांच्या शेअरच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची फेस व्हॅल्यू २ रुपयांपर्यंत कमी होईल. कंपनीनं या शेअर स्प्लिटसाठी १० जानेवारी २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी?
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २१५३.३० कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात २०.२० टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १७९१.८० कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलातही १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागील वर्ष कसं गेलं?
गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किमती तब्बल १९ टक्क्यांनी घसरल्या आहेत. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरची किंमत ३९ टक्क्यांनी वाढली आहे. तर, श्रीराम फायनान्सच्या शेअरच्या किंमतीत २ वर्षांपासून १२० टक्क्यांची वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)