Shreeji Global FMCG Shares: बाजारात जोरदार तेजी असतानाही, श्रीजी ग्लोबल एफएमसीजीचे शेअर्स पहिल्याच दिवशी धडाम झाले. श्रीजी ग्लोबल एफएमसीजीच्या शेअर्सची लिस्टिंग अतिशय निराशाजनक झाली आहे. कंपनीचे शेअर्स बुधवारी NSE वर २० टक्के डिस्काउंटसह ₹१०० वर लिस्ट झाले. IPO मध्ये कंपनीच्या शेअरचा दर ₹१२५ होता. लिस्टिंगनंतर श्रीजी ग्लोबल एफएमसीजीचे शेअर्स घसरून ₹९९ पर्यंत खाली आले होते. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार ₹८५ कोटी रुपयांपर्यंतचा होता.
कमकुवत लिस्टिंगनंतर शेअर्स थोडे सावरले
खराब लिस्टिंगनंतर श्रीजी ग्लोबल एफएमसीजीच्या शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी दिसून आली आहे. कंपनीचे शेअर्स ५ टक्के वाढून ₹१०५ वर पोहोचले आहेत. श्रीजी ग्लोबल एफएमसीजीचा IPO गुंतवणूक करण्यासाठी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडला होता आणि तो ७ नोव्हेंबरपर्यंत खुला होता. IPO पूर्वी कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ९९.९९ टक्के होता, जी आता ७०.१२ टक्के राहिला आहे.
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा'
कंपनीचा व्यवसाय
श्रीजी ग्लोबल एफएमसीजी, मसाले आणि मिश्रणांची अनोखी विविधता ऑफर करते. सध्या, कंपनी ग्राऊंड अँड होल स्पाईसेस, सीड्स, धान्य, कडधान्ये, पीठ आणि इतर खाद्य उत्पादनांमध्ये व्यवहार करते. कंपनी आपल्या उत्पादनांचं मार्केटिंग 'सेठजी' या ब्रँड नावानं करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये चणा, जिरे, धणे, शेंगदाणे, कलौंजी सीड्स, बडीशेप, लाल मिरची पावडर, हळद पावडर यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कंपनी काही कृषी वस्तूंची आयात देखील करते.
कंपनीचा IPO ३ पटीहून अधिक सबस्क्राइब झाला होता
श्रीजी ग्लोबल एफएमसीजीचा IPO एकूण ३.२७ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या IPO मध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा २.९१ पट सबस्क्राइब झाला. तर, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कॅटेगरीत ५.०६ पट बोली लागली होती. कंपनीच्या IPO मध्ये क्वॉलिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स कॅटेगरीत १.६४ पट सबस्क्रिप्शन मिळाले.
श्रीजी ग्लोबल एफएमसीजीच्या IPO मध्ये सामान्य गुंतवणूकदार २ लॉटसाठीच बोली लावू शकत होते. IPO च्या २ लॉटमध्ये २००० शेअर्स होते. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना २ लॉटसाठी ₹२.५० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
