Lokmat Money >शेअर बाजार > 'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

share market : आठवडा बदलला असला तरी भारतीय शेअर बाजाराचे नशीब बदललेले नाही. आजही शेअर बाजारात लक्षणीय घट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:06 IST2025-01-13T14:06:31+5:302025-01-13T14:06:31+5:30

share market : आठवडा बदलला असला तरी भारतीय शेअर बाजाराचे नशीब बदललेले नाही. आजही शेअर बाजारात लक्षणीय घट झाली आहे.

share market why share market is falling 5 big reason behind sensex and nifty down | 'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

'या' ५ कारणांमुळे शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स-निफ्टी जोरात कोसळले; गुंतवणूकदारांनी काय करावं?

share market :शेअर बाजारात सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी निफ्टी, सेन्सेक्स आणि निफ्टी बँक जवळपास 1% च्या घसरणीसह उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात अनेक आघाडीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. क्षेत्रीय आघाडीवर, जवळजवळ सर्व क्षेत्रे लाल रंगात व्यवहार करताना पाहायला मिळतायेत. रियल्टी, मेटल, इन्फ्रा आणि ऑइल अँड गॅस समभागांमध्ये सर्वाधिक दबाव दिसून येत आहे. या घसरणीमागे ५ महत्त्वाची कारणे आहेत.

गेल्या शुक्रवारी जाहीर झालेल्या यूएस रोजगार डेटाने जागतिक बाजारपेठांना धक्का दिला. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये ४.१ टक्क्यांवर घसरला होता. मात्र, नोकऱ्यांमध्ये चांगली वाढ झाली. डेटानुसार यूएस कामगार बाजार अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट होते. याचा अर्थ फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी आहे, ज्यामुळे तरलतेवर (Liquidity) परिणाम झाला आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे.

परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्री
परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) केलेल्या विक्रीमुळे भारतीय बाजारावर दबाव वाढला आहे. जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात एफपीआयने २१,३५० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. डिसेंबरमध्ये १६,९८२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले गेले. एपीआयद्वारे विक्रीची ही प्रक्रिया अमेरिकन रोखे उत्पन्नात वाढ, भारतातील कंपन्यांची कमकुवत कमाई आणि शेअर बाजारातील शेअर्सच्या उच्च किंमती (Overvaluation) यामुळे होत आहे.

कच्च्या तेलानेही टाकली भर
याशिवाय जागतिक कच्च्या तेलाच्या किमती १५ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अमेरिकेने रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधांमुळे या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाचा मोठा आयातदार असलेल्या भारताला या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर दबाव येतो आणि महागाई वाढते.

रुपयाची घसरण झाल्याने आयात महागली
रुपयाच्या कमजोरीमुळेही बाजाराची चिंता वाढली आहे. सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८६.२७ रुपयांची विक्रमी नीचांकी पातळी गाठली. डॉलरची मजबूती आणि अमेरिकेतील रोखे उत्पन्नात झालेली वाढ यामुळे रुपया कमजोर झाला आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे परदेशी गुंतवणूकदार दूर जाऊ शकतात आणि आयात महाग होऊ शकते. याशिवाय अमेरिकन शेअर बाजारातील घसरण हे देखील एक कारण आहे. त्यामुळे आशियाई बाजारांवरही दबाव निर्माण झाला आहे. देशांतर्गत दबाव आणि जागतिक आर्थिक परिस्थिती यांच्या संयोगाने भारतीय शेअर बाजारासाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

कधीपर्यंत होईल रिकव्हरी
या प्रश्नाचे नेमके उत्तर कोणाकडे नाही. अद्याप कोणत्याही तज्ज्ञाने नजीकच्या भविष्यात अच्छे दिन परत येण्याचा उल्लेख केलेला नाही. पीटीआयच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी भाकीत केले आहे की स्थिर जागतिक वाढ असूनही २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था "किंचित कमकुवत" होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?
इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालात लिहिले आहे, की गेल्या आठवड्यात, आयटी निर्देशांक तेजीच्या कँडलस्टिक फॉर्मेशनसह बंद झाला. यामुळे निफ्टीलाही सपोर्ट मिळू शकतो. आयटी निर्देशांक TCS आणि HCL टेकच्या नेतृत्वाखालील अलीकडच्या स्विंगला मागे टाकू शकतो. या शेअर्समध्ये कोणतीही घसरण ही खरेदीची संधी असेल.

Web Title: share market why share market is falling 5 big reason behind sensex and nifty down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.