Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के कर आकारणीची घोषणा केल्यानंतर झालेल्या मोठ्या घसरणीतून सावरल्यानंतर आज बाजारानं ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:11 IST2025-08-04T10:11:19+5:302025-08-04T10:11:19+5:30

Share Market Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के कर आकारणीची घोषणा केल्यानंतर झालेल्या मोठ्या घसरणीतून सावरल्यानंतर आज बाजारानं ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू केले.

Share Market Today Stock market starts with a bullish start Sensex opens with a gain of 166 and Nifty 31 points reliance tata itc shares rose | Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के कर आकारणीची घोषणा केल्यानंतर झालेल्या मोठ्या घसरणीतून सावरल्यानंतर आज बाजारानं ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू केले. सोमवारी, बीएसई सेन्सेक्स १६५.९२ अंकांनी वाढून ८०,७६५.८३ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, आज एनएसई निफ्टी ५० निर्देशांक देखील ३०.७० अंकांनी वाढून २४,५९६.०५ अंकांवर उघडला. आज, प्रामुख्यानं आयटी शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सलग ४ दिवस घसरण दिसून आली.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित १० कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. दुसरीकडे, आज निफ्टी ५० मधील ५० पैकी ३१ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित १४ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये उघडले, तर ५ कंपन्यांचे शेअर्स आज कोणताही बदल न होता उघडले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, अदानी पोर्ट्सचे शेअर्स आज सर्वाधिक १.५४ टक्के वाढीसह उघडले आणि बजाज फायनान्सचे शेअर्स आज सर्वाधिक ०.४४ टक्के घसरणीसह उघडले.

भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."

या शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.९५ टक्के, टाटा स्टील ०.८८, आयटीसी ०.७१, एशियन पेंट्स ०.५८, बीईएल ०.५२, मारुती सुझुकी ०.५०, बजाज फिनसर्व्ह ०.५०, एनटीपीसी ०.४५, टीसीएस ०.३८, ट्रेंट ०.३५, सन फार्मा ०.३४, आयसीआयसीआय बँक ०.३२, एसबीआय ०.१३, अल्ट्राटेक सिमेंट ०.०८, भारती एअरटेल ०.०६, अ‍ॅक्सिस बँक ०.०६, टाटा मोटर्स ०.०५, एचडीएफसी बँक ०.०४ आणि एल अँड टीचे शेअर्स ०.०१ टक्क्यांनी वधारले.

या शेअर्समध्ये घसरण

दुसरीकडे, सोमवारी, एटरनलचे शेअर्स ०.३६ टक्क्यांनी, इन्फोसिस ०.३१, महिंद्रा अँड महिंद्रा ०.२८, टेक महिंद्रा ०.२८, एचसीएल टेक ०.१८, कोटक महिंद्रा बँक ०.११, पॉवरग्रिड ०.१०, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.०५ आणि टायटनचे शेअर्स ०.०३ टक्क्यांनी घसरले.

Web Title: Share Market Today Stock market starts with a bullish start Sensex opens with a gain of 166 and Nifty 31 points reliance tata itc shares rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.