Lokmat Money >शेअर बाजार > आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:08 IST2024-12-06T10:08:50+5:302024-12-06T10:08:50+5:30

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे.

share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks | आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वैमासिक आढावा बैठक होत आहे. या घोषणेपूर्वी शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली आहे. हिरव्या रंगात उघडल्यानंतर बाजार लाल आणि हिरव्यामध्ये डोलत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स १०.०६ अंकांनी वाढून ८१,७६७.२४ अंकांवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी NSE निफ्टी ९.५५ अंकांनी घसरून २४,६९८.८५ अंकांवर व्यवहार करत आहे. 

मजबूत शेअर्सवर नजर टाकायची झाल्यास आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, सनफार्मा, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि एचसीएलटेक तेजीत आहेत. त्याचवेळी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स इत्यादी शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

५ दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५ लाख कोटींची वाढ
गेल्या पाच सत्रांपासून देशांतर्गत बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५.१८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पाच व्यापार सत्रांमध्ये बीएसई सेन्सेक्स २,७२२.१२ अंकांनी किंवा ३.४४ टक्क्यांनी वाढला आहे. गुरुवारी सेन्सेक्स ८०९.५३ अंकांनी वाढून ८१,७६५.८६ वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्समध्ये लिस्टेड ३० कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या पाच सत्रांमध्ये १५,१८,९२६.६९ कोटी रुपयांनी वाढून ४,५८,१७,०१०.११ कोटी रुपये झाले. तर NSE निफ्टी गुरुवारी २४०.९५ अंकांच्या वाढीसह २४,७०८.४० अंकांवर बंद झाला.

आरबीआयच्या चलनधोरण बैठकीवर लक्ष
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस खूप खास आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) च्या चलनविषयक धोरणाच्या घोषणेवर बाजाराची नजर असेल. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावल्यानंतर, आरबीआयने त्याचा धोरणात्मक दर म्हणजे रेपो रेट कमी करून व्याजदरात कपात करतो की नाही? याकडे देशवासीयांचे लक्ष लागून आहे. तसेच, बँकिंग व्यवस्थेतील रोख रक्कम वाढवण्यासाठी RBI कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) कमी करेल का? असाही प्रश्न आहे. या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात दिसणारी नेत्रदीपक वाढ भविष्यातही कायम राहते की नाही हे या गोष्टींवर अवलंबून असेल?
 

Web Title: share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.