Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Sensex मध्ये १४६ आणि निफ्टीत ४७ अंकांची घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

Sensex मध्ये १४६ आणि निफ्टीत ४७ अंकांची घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारानं आज पुन्हा एकदा घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराची सुरुवात केली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी बीएसई सेन्सेक्स १४६.३६ अंकांच्या घसरणीसह ८२,४८०.४० अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:59 IST2026-02-16T09:59:07+5:302026-02-16T09:59:07+5:30

Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारानं आज पुन्हा एकदा घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराची सुरुवात केली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी बीएसई सेन्सेक्स १४६.३६ अंकांच्या घसरणीसह ८२,४८०.४० अंकांवर उघडला.

Share Market Today Sensex falls by 146 points and Nifty by 47 points These stocks hit | Sensex मध्ये १४६ आणि निफ्टीत ४७ अंकांची घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

Sensex मध्ये १४६ आणि निफ्टीत ४७ अंकांची घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: शांतर्गत शेअर बाजारानं आज पुन्हा एकदा घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराची सुरुवात केली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी बीएसई सेन्सेक्स १४६.३६ अंकांच्या (०.१८%) घसरणीसह ८२,४८०.४० अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही आज ४७.५० अंकांच्या (०.१९%) नुकसानीसह २५,४२३.६० अंकांवर खुला झाला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात शुक्रवारी देखील बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स १,०४८.१६ अंकांनी (१.२५%) घसरून ८२,६२६.७६ अंकांवर, तर निफ्टी ३३६.१० अंकांच्या (१.३०%) घसरणीसह २५,४७१.१० अंकांवर उघडला होता.

निफ्टी ५० मधील ३४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण

सोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांच्या शेअर्सनी वाढीसह हिरव्या चिन्हात व्यवहार सुरू केला, तर उर्वरित १५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. निफ्टी ५० बाबत बोलायचे झाले तर, ५० पैकी केवळ १६ कंपन्यांचे स्टॉक्स वेगानं ग्रीन झोनमध्ये उघडले आणि उर्वरित ३४ कंपन्यांच्या शेअर्सना नुकसानीचा सामना करावा लागला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसचे शेअर्स आज सर्वाधिक १.०३ टक्क्यांच्या वाढीसह उघडले, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स आज सर्वाधिक १.०७ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.

Post Office मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, सोबत सरकारची गॅरेंटीही

सेन्सेक्समधील इतर शेअर्सची आजची स्थिती

सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये आज पॉवर ग्रिडचे शेअर्स ०.७१ टक्के, एचसीएल टेक ०.५७ टक्के, आयटीसी ०.३० टक्के, एनटीपीसी ०.२९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.२७ टक्के, एशियन पेंट्स ०.२७ टक्के आणि टेक महिंद्रा ०.२१ टक्क्यांच्या वाढीसह उघडले. याशिवाय कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा, इंडिगो, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्येही किरकोळ वाढ पाहायला मिळाली.

दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सनी ०.९४ टक्के, इन्फोसिस ०.७२ टक्के, बीईएल ०.६८ टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंटने ०.६४ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार सुरू केला. तसंच टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन, एल अँड टी, ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी, ट्रेंट, भारती एअरटेल आणि एटरनल या कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज घसरण नोंदवण्यात आली.

Web Title : सेंसेक्स और निफ्टी में गिरावट; ये स्टॉक आज गिरे

Web Summary : भारतीय शेयर बाजार लाल निशान में खुला, सेंसेक्स और निफ्टी में गिरावट आई। निफ्टी 50 के अधिकांश शेयरों को नुकसान हुआ। टीसीएस के शेयर बढ़े, जबकि अडानी पोर्ट्स के शेयरों में भारी गिरावट आई। अन्य शेयरों में भी मिलाजुला कारोबार हुआ।

Web Title : Sensex and Nifty Fall; These Stocks Dropped Today

Web Summary : The Indian stock market opened in the red, with Sensex and Nifty declining. Most Nifty 50 stocks faced losses. TCS shares rose, while Adani Ports shares fell significantly. Other shares also experienced mixed trading.