Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला

जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला

Share Market Today: सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराने जागतिक संकेतांच्या दबावाखाली अत्यंत कमकुवत सुरुवात केली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:22 IST2026-04-06T10:22:07+5:302026-04-06T10:22:07+5:30

Share Market Today: सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराने जागतिक संकेतांच्या दबावाखाली अत्यंत कमकुवत सुरुवात केली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.

share market today Global cues cause stock market to fall Sensex falls 384 points Nifty falls 116 points | जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला

जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला

Share Market Today: सोमवारी सकाळी भारतीय शेअर बाजाराने जागतिक संकेतांच्या दबावाखाली अत्यंत कमकुवत सुरुवात केली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही मुख्य निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. सकाळी ९ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स ३८४.५२ अंकांनी कोसळून ७२,९३५.०३ च्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजारातील या पडझडीमुळे सुरुवातीच्या सत्रात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्येही मोठी पडझड

सेन्सेक्सप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी ११६.२० अंकांनी घसरून २२,५९६.९० च्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजार उघडल्यानंतर काही मिनिटांतच निफ्टीनं महत्त्वपूर्ण पातळ्या ओलांडल्या, ज्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बाजारात अधिक विक्रीचे संकेत मिळाले. जागतिक स्तरावर असलेल्या अनिश्चिततेचा थेट परिणाम निफ्टीमधील दिग्गज शेअर्सवर दिसून आला.

सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा

ट्रम्प यांचा इशारा आणि जागतिक बाजारावर उमटलेले पडसाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत दिलेल्या नवीन धमकीमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून, त्याचा थेट परिणाम आशियाई आणि भारतीय बाजारावर झाला. इराणमधील युद्ध आणि तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली शंका यामुळे जागतिक गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. आजच्या व्यवहारात केवळ मुख्य निर्देशांकच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली.

संमिश्र कल आणि बँकिंग क्षेत्राची कामगिरी

बाजारात एकूण घसरण असली तरी काही क्षेत्रांनी सकारात्मक कामगिरी केली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्समध्ये सुमारे २% ची वाढ झाली, तर निफ्टी मेटल इंडेक्स १% ने वधारला. ऑटो, बँक, आयटी आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्रांतही सुमारे ०.५% ची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. मात्र, निफ्टी ऑईल अँड गॅस आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव राहिल्यानं तिथे १% पर्यंत घसरण झाली.

चलन बाजारात भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत झेप

शेअर बाजारात घसरण असली तरी चलन बाजारातून भारतासाठी एक सकारात्मक बातमी आली. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३३ पैशांनी वधारला. या मजबुतीमुळे रुपया ९२.८५ च्या पातळीवर पोहोचला, ज्यामुळे आयातदारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आशियाई बाजारपेठांमधील स्थिती

भारताव्यतिरिक्त इतर आशियाई बाजारांमध्ये मात्र काही प्रमाणात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.१ टक्क्यांनी वाढून ५३,६९२.४२ वर पोहोचला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी १.५ टक्क्यांनी वधारला. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील बाजारपेठा सुट्ट्यांमुळे बंद होत्या, तरीही सुरू असलेल्या बाजारांमध्ये गुंतवणूकदार कच्च्या तेलाच्या किमती आणि ट्रम्प यांच्या विधानांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

Web Title : वैश्विक संकेतों से शेयर बाजार में गिरावट; सेंसेक्स, निफ्टी में भारी गिरावट।

Web Summary : वैश्विक दबाव के कारण भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई। सेंसेक्स में 384 अंक और निफ्टी में 116 अंकों की गिरावट आई। भू-राजनीतिक तनाव और मिश्रित क्षेत्रीय प्रदर्शन ने बाजार को प्रभावित किया, जबकि डॉलर के मुकाबले रुपया मजबूत हुआ।

Web Title : Stock market plunges on global cues; Sensex, Nifty decline sharply.

Web Summary : Indian stock market fell sharply due to global pressures. Sensex declined by 384 points, Nifty by 116. Geopolitical tensions and mixed sector performances influenced the market, while the rupee strengthened against the dollar.