Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today: ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी

Share Market Today: ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक मोठ्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 09:59 IST2025-02-04T09:59:11+5:302025-02-04T09:59:11+5:30

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक मोठ्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला.

Share Market Today donald Trump s U turn on tariffs stock market buoyant ONGC Hindalco Infosys rise | Share Market Today: ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी

Share Market Today: ट्रम्प यांचा टॅरिफवर यु-टर्न, शेअर बाजार सुस्साट; ONGC, Hindalco, Infosys मध्ये तेजी

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक मोठ्या तेजीसह उघडले. सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला. तर निफ्टी २३,५०० च्या वर उघडला. बँक निफ्टीही ४३० अंकांच्या आसपास वधारला होता. मिडकॅप निर्देशांक ७०० अंकांनी वधारला. मेटल शेअर्समध्ये तेजी होती. आज सकाळी रुपया १५ पैशांनी मजबूत होऊन ८७.०४ डॉलर्सवर पोहोचला.

शेअर बाजाराची सुरुवाताच दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स ५०१ अंकांनी वधारून ७७,६८७ वर बंद झाला. निफ्टी १४८ अंकांनी वधारून २३,५०९ अंकांवर उघडला. तर बँक निफ्टी ३२८ अंकांनी वधारून ४९,५३८ वर बंद झाला.

मंगळवारी (४ फेब्रुवारी) जागतिक बाजारातून स्थिर संकेत मिळाले. गिफ्ट निफ्टीनं १०० अंकांची झेप घेतली होती. प्रत्यक्षात टॅरिफ वॉरचं संकट तूर्तास टळल्याचं दिसत आहे. टॅरिफ वॉरमध्ये ट्रम्प यांचा यू-टर्न पाहायला मिळालाय. मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णय त्यांनी एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. जोरदार विक्रीनंतर डाऊ ५५० अंकांनी वधारून केवळ १२५ अंकांनी खाली बंद झाला, तर नॅसडॅक २५० अंकांनी घसरला.

गिफ्ट निफ्टी १०० अंकांनी वधारून २३५५० वर तर डाऊ फ्युचर्स १२५ अंकांनी वधारला. निक्केईनं ६०० अंकांची झेप घेतली. आठवडाभराच्या सुट्टीनंतर चीनच्या बाजारपेठा आज उघडणार आहेत. कालच्या घसरणीत एफआयआयनं कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्स सह ७१०० कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली होती, तर देशांतर्गत फंडांनी २७०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

Web Title: Share Market Today donald Trump s U turn on tariffs stock market buoyant ONGC Hindalco Infosys rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.