Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले

Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले

Share Market Today, 24 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी मोठी घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६५.५९ अंकांच्या मोठ्या घसरणीसह ८२,७२९.०७ अंकांवर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:14 IST2026-02-24T10:14:01+5:302026-02-24T10:14:01+5:30

Share Market Today, 24 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी मोठी घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६५.५९ अंकांच्या मोठ्या घसरणीसह ८२,७२९.०७ अंकांवर व्यवहार करत होता.

Share Market Today 24 feb 2026 Big fall in the stock market Nifty falls by 152 points IT stocks hit hard | Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले

Share Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, निफ्टी १५२ अंकांनी घसरला; IT स्टॉक्स जोरदार आपटले

Share Market Today, 24 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजाराची मंगळवारी मोठी घसरण होऊन व्यवहाराला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता बीएसई सेन्सेक्स ५६५.५९ अंकांच्या (०.६८%) मोठ्या घसरणीसह ८२,७२९.०७ अंकांवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही १५१.७० अंकांच्या (०.५९%) नुकसानीसह २५,५६१.३० अंकांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे सोमवारी बाजारात चांगली वाढ दिसून आली होती. सोमवारी सेन्सेक्स ४७९.९५ अंक म्हणजेच ०.५८% च्या वाढीसह ८३,२९४.६६ अंकांवर आणि निफ्टी १४१.७५ अंक म्हणजेच ०.५५% च्या वाढीसह २५,७१३ च्या स्तरावर बंद झाला होता.

सेन्सेक्समधील कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती

मंगळवारी सकाळी ९.२७ वाजता सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ८ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हावर व्यवहार करत होते, तर उर्वरित २२ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल चिन्हावर होते. तसंच निफ्टी ५० मधील ५० पैकी केवळ १४ कंपन्यांचे स्टॉक्स तेजीत होते आणि उर्वरित ३६ कंपन्यांचे शेअर्स तोट्यात होते. कामकाजादरम्यान सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक ०.४६ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते, तर इटर्नलचे शेअर्स आज सर्वाधिक ३.५१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

PNB मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४२,८७५ चं फिक्स व्याज, पाहा स्कीमचे डिटेल्स

सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील इतर स्टॉक्समध्ये पॉवर ग्रिडचे शेअर्स ०.३३ टक्के, भारतीय स्टेट बँक ०.२२ टक्के, एनटीपीसी ०.२१ टक्के, ॲक्सिस बँक ०.१९ टक्के, एशियन पेंट्स ०.१७ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.०५ टक्के आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.०५ टक्क्यांच्या तेजीसह व्यवहार करत होते.

आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण

दुसरीकडे, आयटी आणि इतर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. यामध्ये एचसीएल टेकचे शेअर्स ३.१५ टक्के, इन्फोसिस ३.१० टक्के, टेक महिंद्रा २.७० टक्के, टीसीएस २.६८ टक्के आणि भारती एअरटेल २.४८ टक्क्यांनी घसरले. तसंच बजाज फायनान्स १.४३ टक्के, ट्रेंट १.२२ टक्के, बीईएल ०.९८ टक्के, आयटीसी ०.७१ टक्के, टायटन ०.७० टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.६९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.५८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.५३ टक्के, मारुती सुझुकी ०.४४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३८ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.२९ टक्के, इंडिगो ०.२७ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२२ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.२२ टक्के, सन फार्मा ०.२० टक्के आणि एल अँड टी चे शेअर्स ०.०९ टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते.

Web Title : शेयर बाजार में भारी गिरावट: निफ्टी 152 अंक नीचे; आईटी स्टॉक धराशायी

Web Summary : भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट देखी गई। निफ्टी 50 में 152 अंकों की गिरावट आई, आईटी शेयरों को सबसे ज्यादा नुकसान हुआ। कुछ शेयरों में तेजी रही, लेकिन ज्यादातर, खासकर आईटी सेक्टर में, लाल निशान पर कारोबार हुआ, जिससे सोमवार का सकारात्मक रुझान उलट गया।

Web Title : Share Market Plunges: Nifty Down 152 Points; IT Stocks Crash

Web Summary : Indian share market faced a significant downturn. The Nifty 50 fell by 152 points, with IT stocks experiencing the biggest losses. While some stocks showed gains, most, especially in the IT sector, traded in the red, reversing Monday's positive trend.