Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराचा दमदार ‘कमबॅक’! 'या' पाच कारणांमुळे गुंतवणूकदारांनी कमावले ६.५० लाख कोटी

शेअर बाजाराचा दमदार ‘कमबॅक’! 'या' पाच कारणांमुळे गुंतवणूकदारांनी कमावले ६.५० लाख कोटी

Share Market : सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ नोंदवली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 19:18 IST2026-03-10T19:16:44+5:302026-03-10T19:18:06+5:30

Share Market : सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ नोंदवली गेली.

Share Market: Stock market makes a strong comeback after the crash! Investors earned Rs 6.50 lakh crore due to these five reasons | शेअर बाजाराचा दमदार ‘कमबॅक’! 'या' पाच कारणांमुळे गुंतवणूकदारांनी कमावले ६.५० लाख कोटी

शेअर बाजाराचा दमदार ‘कमबॅक’! 'या' पाच कारणांमुळे गुंतवणूकदारांनी कमावले ६.५० लाख कोटी

Share Market : शेअर बाजारात मंगळवारी (१० मार्च) जोरदार तेजी पाहायला मिळाली. सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ नोंदवली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील युद्ध लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ६४० अंकांनी (०.८२%) वाढून ७६,२०५ वर बंद झाला, तर निफ्टी फिफ्टी निर्देशांक २३४ अंकांनी (०.९७%) वाढून २४,२६१ वर स्थिरावला.

मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी

मोठ्या कंपन्यांबरोबरच मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही चांगली वाढ दिसून आली. BSE १५० मिडकॅप इंडेक्स १.६६% वाढला, तर BSE २५० स्मॉलकॅप इंडेक्स २.०४% वाढला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे ६.५० लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४४१ लाख कोटी रुपयांवरून वाढून सुमारे ४४७ लाख कोटी रुपये झाले.

शेअर बाजारात तेजीची ५ प्रमुख कारणे

१) अमेरिका-इराण युद्ध लवकर संपण्याची शक्यता

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर संयुक्त हल्ला केला होता. सध्या युद्ध दुसऱ्या आठवड्यात असले तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या हवाई दल आणि नौदलाला मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे युद्ध लवकर थांबू शकते. या संकेतामुळे जागतिक बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाली.

२) कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

युद्ध लवकर संपण्याच्या संकेतांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली. ट्रम्प यांनी तेल वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिकन नौदल पाठवण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगितले. दरम्यान, G7 देशांनी जागतिक ऊर्जा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे मंगळवारी दुपारी ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ९% घसरून प्रति बॅरल ९० डॉलरपर्यंत आली. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला.

३) रुपयांत सुधारणा

भारतीय रुपयातही मोठी सुधारणा दिसून आली. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार मंगळवारी रुपया ५३ पैशांनी मजबूत होऊन १ डॉलर = ९१.८० रुपयांवर बंद झाला. याआधी सोमवारी रुपया ९२.३३ प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला होता. रुपयातील मजबुतीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

४) मोठ्या क्षेत्रांमध्ये व्हॅल्यू बायिंग

अलीकडील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्तीय सेवा, ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. निफ्टी ऑटो ३% पेक्षा अधिक वाढला, तर PSU बँक इंडेक्समध्येही २% पेक्षा जास्त वाढ झाली. याशिवाय, निफ्टी बँक आणि फायनान्शियल सर्व्हिसेस सुमारे २% आणि फार्मा सेक्टर १.४% वाढले. मात्र निफ्टी आयटी इंडेक्स ०.४६% घसरून बंद झाला..

५) डॉलर इंडेक्स आणि बॉन्ड यील्डमध्ये घट

अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये अर्धा टक्का घसरण झाली. तसेच १० वर्षांच्या अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये ४.२% वरून सुमारे ४% पर्यंत घट झाली. यामुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडील कल कमी झाला आणि जोखमीच्या गुंतवणुकीकडे (Risk Assets) कल वाढला, ज्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला.

(विशेष सूचना- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : शेयर बाजार की दमदार वापसी: निवेशकों ने कमाए 6.5 लाख करोड़ रुपये

Web Summary : मध्य पूर्व में तनाव कम होने की संभावना और कच्चे तेल की कीमतों में गिरावट सहित सकारात्मक वैश्विक संकेतों के कारण शेयर बाजार में जोरदार उछाल आया। बैंकिंग, ऑटो और फार्मा क्षेत्रों में खरीदारी से सेंसेक्स और निफ्टी में तेजी आई, जिससे निवेशकों को 6.5 लाख करोड़ रुपये का लाभ हुआ। रुपये में मजबूती और बांड यील्ड में गिरावट ने भी मनोबल बढ़ाया।

Web Title : Share Market's Strong Comeback: Investors Earn ₹6.5 Lakh Crore

Web Summary : The share market rebounded strongly due to positive global cues, including potential de-escalation in the Middle East and falling crude oil prices. Investors gained ₹6.5 lakh crore as the Sensex and Nifty surged, driven by buying in banking, auto, and pharma sectors. Rupee appreciation and declining bond yields further boosted sentiment.