Lokmat Money >शेअर बाजार > Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २५०.४४ अंकांच्या वाढीसह ८०,९६८.४५ वर व्यवहार करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 09:55 IST2025-09-05T09:55:46+5:302025-09-05T09:55:46+5:30

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २५०.४४ अंकांच्या वाढीसह ८०,९६८.४५ वर व्यवहार करत होता.

Share Market Stock market boom Sensex rises by 250 points Nifty also rises These stocks shine | Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले

Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले

शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २५०.४४ अंकांच्या वाढीसह ८०,९६८.४५ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी देखील ६९.८ अंकांच्या वाढीसह २४,८०४.१० वर व्यवहार करत होता. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, ट्रेंट, एशियन पेंट्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा मोटर्स, जिओ फायनान्शियल हे निफ्टीवरील सर्वाधिक तेजी असलेले शेअर्स ठरले. तर टाटा कंझ्युमर, अपोलो हॉस्पिटल्स, एचयूएल, एनटीपीसी आणि टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट व्यवहार करत आहेत.

शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे रुपया १ पैशानं वधारून ८८.११ वर पोहोचला. दरम्यान, परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, सततच्या एफआयआयच्या बाहेर जाण्यामुळे स्थानिक चलनात आणखी वाढ मर्यादित राहिली.

पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित

त्यांनी सांगितले की, देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक भावनांमुळे रुपयाला आणखी आधार मिळाला, जो या आठवड्याच्या सुरुवातीला विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८.११ वर उघडला आणि नंतर ८८.१५ वर घसरला, नंतर तो पुन्हा ८८.११ वर पोहोचला, जो त्याच्या मागील बंदपेक्षा १ पैशानं वाढ दर्शवितो, असं वृत्त पीटीआयनं दिलं.

Web Title: Share Market Stock market boom Sensex rises by 250 points Nifty also rises These stocks shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.