Lokmat Money >शेअर बाजार > मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार?

मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार?

small and midcap stocks crash : गेल्या वर्षी बंपर परतावा देणारे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. ही घसरण कधी थांबणार? यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 13:02 IST2025-02-17T13:01:47+5:302025-02-17T13:02:08+5:30

small and midcap stocks crash : गेल्या वर्षी बंपर परतावा देणारे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. ही घसरण कधी थांबणार? यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

share market small and midcap stocks crash bear market hits | मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार?

मिड आणि स्मॉल कॅप शेअर्ससाठी धोक्याची घंटा; 'या' कारणांमुळे स्टॉक्स अजून रसातळाला जाणार?

small and midcap stocks crash : शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सर्वात वेगाने नफा कमवायचा असेल तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर यात तथ्यही आहे. निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांकाने २०२४ मध्ये २५% परतावा दिला होता. निफ्टी ५० ने याच कालावधीत ९% परतावा दिला होता. त्याचप्रमाणे निफ्टी मिडकॅप १५० मध्ये गेल्या वर्षी २३% ची वाढ झाली होती. मात्र, २०२५ मध्ये परिस्थिती उलट झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांक १८.३१% ने घसरला आहे. तर निफ्टी मिडकॅप १५० १३.२२% घसरला आहे. ही घसरण पुढेही थांबणार नसल्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामागे काही कारणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये का होतेय घसरण? 
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे उच्च मूल्यांकन. मिड आणि स्मॉल कॅप समभागांचे पी/ई प्रमाण ४३x वर पोहोचले असल्याचा इशारा ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे CIO शंकरन नरेन गुंतवणूकदारांना दिला आहे. जे अत्यंत ‘विसंगत’ आणि अस्थिर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. १४ फेब्रुवारी रोजी, स्मॉलकॅप १०० निर्देशांक त्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा २१.६% खाली बंद झाला. दुसरीकडे, मिड कॅप १०० निर्देशांक २४ सप्टेंबरच्या उच्चांकावरून १८.४% खाली होता. याचाच अर्थ बाजारात अस्वलाचे वर्चस्व वाढत आहे.

मोतीलाल ओसवाल यांच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये प्रवेश करण्याची ही योग्य वेळ नाही. ब्रोकरेजनुसार, स्मॉल-कॅप इंडेक्स १२ महिन्याच्या फॉरवर्ड प्राइस-टू-अर्निंग (PE) गुणोत्तर २४.५x वर व्यापार करत आहे, जे त्याच्या १० वर्षांच्या सरासरी १६x पेक्षा जास्त आहे. मिड-कॅप निर्देशांकाचा पीई गुणोत्तर ३५.८x आहे, जे त्याच्या २२.४x च्या १० वर्षांच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. निफ्टी ५० चा पीई गुणोत्तर १९.९x आहे, जे त्याच्या १० वर्षांच्या सरासरी २०.६x पेक्षा थोडा कमी आहे.

स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे उच्च मूल्यांकन
बिझनेस टुडे मधील एका अहवालानुसार, लार्ज कॅप समभागांचे मूल्यांकन योग्य पातळीवर आले आहे. ते FY27 च्या कमाईवर आधारित सुमारे १८.५x वर व्यापार करत आहेत. पण, मिड आणि स्मॉल-कॅप्स ऐतिहासिक सरासरीपेक्षा १५-२०% जास्त आहेत. पुढील काही तिमाहीत बाजारात सुधारणा दिसू शकते. एक ते दोन वर्षांचा दृष्टिकोन असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, मोठ्या कॅप्स वाजवी मूल्यमापन देतात, तर मिड आणि स्मॉल-कॅप्सना दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक असतो.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: share market small and midcap stocks crash bear market hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.